• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • VIDEO: वर्ध्यात जिनिंग प्रोसेसिंग युनिटला भीषण आग; कापसाचे मोठे नुकसान झाल्याची भीती

VIDEO: वर्ध्यात जिनिंग प्रोसेसिंग युनिटला भीषण आग; कापसाचे मोठे नुकसान झाल्याची भीती

Wardha Fire: वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यातील येरला येथे गिमाटेक्स इंडस्ट्रीच्या जिनिंग प्रोसिंग युनिटला भीषण आग लागली आहे.

 • Share this:
  नरेंद्र मते, प्रतिनिधी वर्धा, 9 मे: वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट (Hinganghat, Wardha) तालुक्यात भीषण आग (massive fire) लागली आहे. हिंगणघाट तालुक्यातील येरला येथे गिमाटेक्स इंडस्ट्रीजच्या जिनिंग प्रोसिंग युनिटला ही आग लागली आहे. आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाहीये. ही आग इतकी भीषण आहे की आगीचे मोठमोठे लोण दूरपर्यंत पहायला मिळत आहेत. हिंगणघाट तालुक्यातील गिमाटेक्स इंडस्ट्रीजच्या राष्ट्रीय महामार्गावरील येरला येथील जिंनिंगला आज अचानक आग लागून तेथे असलेल्या साहित्याचे तसेच वास्तुचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जीनिंगचे परिसरात ठेऊन असलेल्या 7500 कापसाच्या गाठी, 450 टन सरकी तसेच तेथील मशीनरी साहित्य लागलेल्या भीषण आगीत राख झाले असून व्यवस्थापनाच्या वतीने सुमारे 25 करोड़ रूपयाचे नुकसान झाल्याची माहिती देण्यात आली. सदर आग आज दुपारी अंदाजे 2.30 वाजण्याच्या सुमारास लागली असून आगीने लगेच रौद्ररूप धारण केले. बीडमध्ये उन्हाळ्यात पावसाळा, तुफान पावसाने नद्यांना पूर, जीप गेली वाहून VIDEO आगीची माहिती मिळताच वडनेर पोलिस घटनास्थळी पोचली असून आग आटोक्याट आणण्यासाठी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. घटनेची माहिती मिळताच गिमाटेक्स इंडस्ट्रीजचे हिंगणघाट येथील काही वरिष्ठ अधिकारीसुद्धा घटनास्थळी पोचले असल्याची माहिती आहे. सदर घटना शार्टसर्किटमुळे घडली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
  Published by:Sunil Desale
  First published: