मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

VIDEO: तारापूर MIDCमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी

VIDEO: तारापूर MIDCमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी

Boisar-Tarapur MIDC Fire: तारापूर एमआयडीसीमध्ये भीषण आग लागली आहे.

Boisar-Tarapur MIDC Fire: तारापूर एमआयडीसीमध्ये भीषण आग लागली आहे.

Boisar-Tarapur MIDC Fire: तारापूर एमआयडीसीमध्ये भीषण आग लागली आहे.

  • Published by:  Sunil Desale

पालघर, 13 एप्रिल: पालघर जिल्ह्यातील (Palghar District) तारापूर एमआयडीसीमध्ये भीषण आग (Massive fire in Tarapur MIDC) लागल्याची माहिती समोर येत आहे. बोईसर-तारापूर एमआयडीसीत एका केमिकलच्या टँकरला ही आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या (Fire brigade) गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.  ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती मिळू शकलेली नाहीये. केमिकल टँकरला आग लागल्याने आगीने अवघ्या काही क्षणातच रौद्ररूप धारण केल्याचं पहायला मिळत आहे.

न्यूज एजन्सी एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, बोईसर-तारापूर एमआयडीसी परिसरात असलेल्या सिनाय कंपनी (Sinay Company)बाहेर उभ्या असलेल्या एका केमिकल टँकरला ही भीषण आग (fire at chemical tanker) लागली आहे. ही आग इतकी भीषण होती की शेजारील प्लास्टिक पाईपमध्ये पसरली.

आग इतकी मोठी आहे की, दूरुन आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट दिसत आहेत. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असन आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने अद्याप कोणतीही जीवितहानीचं वृत्त नाहीये.

दुपारच्या सुमारास पुण्यात आग 

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटसमोर दुपारच्या सुमारास आग लागली. सीरमसमोर आकाशवाणीची मोकळी जागा आहे, या मोकळ्या जागेत ही आग लागली. गवताला आग लागल्याने अवघ्या काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण केल्याचं पहायला मिळालं.

First published:

Tags: Fire, Palghar