मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /नवी मुंबईत ATM सेंटरला भीषण आग, शेजारीच petrol pump असल्याने भीती; अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात

नवी मुंबईत ATM सेंटरला भीषण आग, शेजारीच petrol pump असल्याने भीती; अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात

एटीएमला आज पहाटे आग (Navi Mumbai Fire) लागल्याची घटना घडली आहे.

एटीएमला आज पहाटे आग (Navi Mumbai Fire) लागल्याची घटना घडली आहे.

एटीएमला आज पहाटे आग (Navi Mumbai Fire) लागल्याची घटना घडली आहे.

नवी मुंबई, 31 मार्च : ऐरोलीमधील पंजाब नॅशनल बँकेच्या एटीएमला आज पहाटे आग (Navi Mumbai Fire) लागल्याची घटना घडली आहे. अचानक लागलेल्या आगीचे कारण स्पष्ट झाले नसले तरीही आग शॉर्ट सर्किटने लागली असावी असा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

पहाटेच्या वेळी ही आग लागली आणि काही मिनिटातच या आगीच्या भक्ष्यस्थानी संपूर्ण एटीएम सेंटर होतं. या एटीएम सेंटरला लागलेल्या आगीत ATM मशीन, पासबुक एण्ट्री मशीन, रोख रक्कम डिपॉझिट करणारी मशीन पूर्णतः जळून खाक झाली आहे. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या आणि जवान घटनास्थळी वेळेत पोहोचल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. काही क्षणात आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.

महत्वाचे म्हणजे या एटीएम सेंटरच्या शेजारीच पेट्रोल पंप आहे. ही आग जर पेट्रोल पंपापर्यंत पोहोचली असती तर मात्र मोठी दुर्घटना घडू शकली असती. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांच्या सतर्कतेमुळे वेळीच आगीवर नियंत्रण मिळवता आलं. आता आग आटोक्यात आल्यानंतरही अग्निशमन दलाच्या जवनांकडून कुलिंगचे काम सुरू आहे.

First published:

Tags: ATM, Fire, Maharashtra, Money, Mumbai, Pnb bank