चंद्रपूरच्या औष्णिक वीज केंद्राला भीषण आग; राज्यातील वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका?

चंद्रपूरच्या औष्णिक वीज केंद्राला भीषण आग; राज्यातील वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका?

Chandrapur thermal power plant fire: बहुतांशी महाराष्ट्राची विजेची भूक भागवणाऱ्या चंद्रपूर येथील औष्णिक वीज केंद्राला रविवारी मध्यरात्री भीषण आग (Massive Fire) लागली आहे.

  • Share this:

चंद्रपूर, 03 मे: बहुतांशी महाराष्ट्राची विजेची भूक भागवणाऱ्या चंद्रपूर येथील औष्णिक वीज केंद्राला (Chandrapur thermal power plant) रविवारी मध्यरात्री भीषण आग (Massive Fire) लागली आहे. ही आग केंद्राच्या कोल हँडलिंग प्लांटच्या क्रशर हाऊसमध्ये लागली असून या आगीत कोळसा घेऊन जाणारा कन्व्हेअर जळूख खाक झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. चंद्रपूर औष्णिक वीज केंद्राला आग लागल्याची माहिती समजात अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाचे जवान आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

या आगीचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नसून ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची प्राथमिक शक्यता वर्तवण्यात आली आहे. चंद्रपूरातील हे औष्णिक वीज केंद्र महाराष्ट्रात वीज निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. अर्ध्यापेक्षा अधिक महाराष्ट्र येथील विजेवर अवलंबून आहे. त्यामुळे दररोज याठिकाणी वीज निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात कोळशाची गरज असते. रविवारी रात्री संच क्रमांक 8 आणि 9 हे मेंटेनन्सच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आले होते. दरम्यान आग लागल्याचं सांगितलं जात आहे.

दिव्य मराठीनं दिलेल्या वृत्तानुसार, रविवारी रात्री संच क्रमांक 8 आणि 9 याठिकाणी वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. दरम्यान याठिकाणी मोठी आग लागली. तेथील कर्मचाऱ्यांना काही कळायच्या आत या आगीनं रौद्ररूप धारण केलं. या आगीत कोळसा वाहून नेणारे दोन कन्व्हेअर बेल्ट जळाले आहे. यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं रात्री उशीरापर्यंत आग आटोक्यात आणण्याचं काम सुरू होतं.

हे ही वाचा-नागपूरमध्ये कोरोनामुळे मृत्यूतांडव, गेल्या 12 दिवसांत 1000 जणांचा मृत्यू

महाराष्ट्रात वीज खंडीत होण्याचा धोका ?

चंद्रपूर वीज औष्णिक केंद्रावरील मुख्य कार्यकारी अभियंता यांनी आग आटोक्यात आल्याची माहिती दिली आहे. पण या आगीत नेमकं किती नुकसान झालं, याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही. त्याचबरोबर या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात कोळशाच्या बफर स्टॉक आहे. त्यामुळे या आगीचा वीज निर्मिती प्रक्रियेवर कोणताही परिणाम होणार नसल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Published by: News18 Desk
First published: May 3, 2021, 2:17 PM IST

ताज्या बातम्या