• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • Ratnagiri News: लोटे एमआयडीसीत केमिकल कंपनीत भीषण स्फोट, पहिला VIDEO

Ratnagiri News: लोटे एमआयडीसीत केमिकल कंपनीत भीषण स्फोट, पहिला VIDEO

धुराचे लोट हे तब्बल 10 किमी अंतरावरून दिसून येत आहे. लोटे एमआयडीसीमधील अपघाताची सहावी घटना आहे.

  • Share this:
खेड, 28 एप्रिल: रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील (khed) लोटे एमआयडीसीत (Lote MIDC) पुन्हा एकदा एका कंपनीला भीषण आग लागली आहे. केमिकल कंपनीत स्फोट झाल्यानंतर आग पसरली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे लोटे एमआयडीसीतील एम आर फार्मा केमिकल कंपनीत (MR Pharma Chemical Company Ratnagiri) भीषण स्फोट झाला आहे. आज सकाळी 11 वाजता ही दुर्घटना घडली आहे. स्फोटानंतर कंपनीत भीषण आग लागली आहे. हा स्फोट इतका भीषण होता की, स्फोटाच्या भीषण आवाजाने कंपनीच्या आजूबाजूचा परिसर हादरला असून अनेक कंपन्यांच्या खिडकीच्या काचा फुटल्या आहे. धुराचे लोट हे तब्बल 10 किमी अंतरावरून दिसून येत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. या दुर्घटनेत अद्याप मृतांची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. घटनास्थळावर मदतकार्य सुरू आहे. लोटे एमआयडीसीमधील अपघाताची सहावी घटना आहे.  मागील महिन्यात 20 मार्च रोजी लोटे एमआयडीसीमधील घरडा केमिकल कंपनीमध्ये (Gharda Chemical Company) भीषण स्फोट झाला होता. या स्फोटाची तीव्रता जास्त होती. स्फोटात 4 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. तर 3 जण जखमी झाले होते. 'मी जीवन जगलो आहे, यांची मुलं अनाथ होतील' RSS स्वयंसेवकाने केला बेडचा त्याग तसंच लोटे औद्योगिक वसाहती (Lote MIDC)मधील प्लॉट नंबर 15 येथील श्री समर्थ इंजिनिअरिंग केमिकल कंपनीत (Shree Samarth Engineering Chemical Company) रिअ‍ॅक्टरचा स्फोट होऊन भीषण आग (Fire) लागली होती. ही आग इतकी भीषण होती की, यात तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. तर सात जण गंभीररित्या जखमी झाले होते. प्रियांका चोप्रामुळं माझं करिअर संपलं; बहिणीनंच केला खळबळजनक आरोप तर, मागील आठवड्यातच लोटे औद्योगिक वसाहतीमधील श्री दुर्गा फाईन केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड या केमिकल कंपनीला बुधवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली होती.  आगीमुळे आणि लागोपाठ 10 ते 12 स्फोटांमुळे लोटे परिसर अक्षरशः हादरून गेला होता. या दुर्घटनेत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली होती. कंपनीत कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी कंपनीबाहेर धाव घेतल्याने सुदैवाने जीवितहानी टळली होती. मात्र कंपनीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले.
Published by:sachin Salve
First published: