खेड, 20 मार्च : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड (khed) येथील लोटे एमआयडीसीमध्ये (Lote MIDC) एका केमिकल कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात 4 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर अन्य 3 कामगार जखमी आहे. जखमी कामगारांना रुग्णालयात हलवलण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लोटे एमआयडीसीमधील घरडा केमिकल कंपनीमध्ये (Gharda Chemical Company) ही घटना घडली आहे. आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास घरडा कंपनीत अचानक स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता जास्त होती. स्फोटात 4 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. तर 3 जण जखमी झाल्याचे वृत्त असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर जखमी अभिजित सुरेश तावडे याला मुंबईला हलवण्यात आले आहे.
...म्हणून अलका याग्निक आमिर खानवर संतापल्या; धक्का देऊन काढलं होतं स्टुडिओबाहेर
घटनेची माहिती मिळताच घरडा कंपनीमध्ये पोलीस, अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले आहे. लोटे एमआयडीसीमधील या आठवड्यातील ही दुसरी घटना आहे.
भाजपच्या नेत्या मेधा कुलकर्णी यांच्याविरोधात मारहाणीची तक्रार, कोथरुडमध्ये खळबळ
सोमवारी लोटे एमआयडीसीमधील सुप्रिया लाइफ सायन्स प्रा. लि. या कंपनीला आग लागली होती. या दुर्घटनेमध्ये 3 जण जखमी झाले होते. शेकडो कामगार असताना कंपनीत आग लागली होती. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही मोठी जिवीतहानी झाली नाही. ही घटना ताजी असताना आज घरडा कंपनीत स्फोट झाला आहे.
लोटे एमआयडीसी मधील घरडा केमिकल कंपनीतील स्फोटात मृत कामगारांची नावे
1- बाळासाहेब रामचंद्र गाढवे राहणार खेर्डी, चिपळूण
2 - महेश महादेव कासार, बीड
3 - राजेश मराठकर,औरंगाबाद
4 आशिष गोगावले, चिपळूण
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Breaking News, Death, Maharashtra, Mumbai, Ratnagiri