Home /News /maharashtra /

...आणि समुद्राने गिळली मारुती स्विफ्ट कार, तरुण-तरुणीला किनाऱ्यावर मस्ती पडली भारी, VIDEO

...आणि समुद्राने गिळली मारुती स्विफ्ट कार, तरुण-तरुणीला किनाऱ्यावर मस्ती पडली भारी, VIDEO

जेव्हा दोघांना सकाळी जाग आली तेव्हा त्यांची मारुती सुझुकी स्विफ्ट कार जागेवर नसल्याचे पहिले.

वसई, 30 डिसेंबर : नववर्षाचं स्वागत (New year celebration) करण्यासाठी सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. संचारबंदीची खबरदारी घेऊन पर्यटन स्थळांवर तुफान गर्दी उसळली आहे. पण  वसईतील (Vasai) एका तरुण तरुणीला मौज मजेसाठी कळंब समुद्र किनाऱ्यावर फिरण्याचा उत्साह चांगलाच अंगलट आला आहे. मंगळवारी सायंकाळी हे तरुण-तरुणी फिरण्यासाठी आपली स्विफ्ट कार घेऊन  समुद्र किनाऱ्यावर गेले होते. दिवसभर किनाऱ्यावर आनंद लुटल्यानंतर रात्रीच्या वेळी त्याच ठिकाणी थांबण्याचा बेत त्यांनी आखला. त्यानंतर या जोडप्याने समुद्राच्या लाटांपासून काही अंतरावरच  आपली कार पार्क केली. त्यानंतर ते किनाऱ्यालगत जाऊन थांबले. रात्रभर कार तिथेच उभा होती. रात्री समुद्राला भरती आणि  भरतीच्या पाण्यासोबत कार पाण्यात वाहून गेली. जेव्हा दोघांना सकाळी जाग आली तेव्हा त्यांची मारुती सुझुकी स्विफ्ट कार जागेवर नसल्याचे पहिले. आधी वाटले कार चोरीला गेली असेल. त्यामुळे त्यांनी सर्वत्र शोधाशोध घेतला. पण, काही वेळाने सुमुद्रात कारचा पांढरा छत दिसून आला. ही कार समुद्राच्या पाण्यात वाहत जाऊन भुईगाव किनाऱ्यावर जाऊन अडकल्याचे दिसून आले. मग काय दोघांची एकच भंबेरी उडाली. शाहीन बागेत CAA विरोधकांवर गोळीबार करणाऱ्या कपिल गुर्जरचा भाजप प्रवेश वादात त्यानंतर याबाबत तात्काळ वसई पोलिसांना आणि अग्निशमन दलाला याची माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.  मागील 20 तासांहून अधिक वेळ ही चारचाकी समुद्रात 500 मीटर अंतरावर असून तिला काढण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. ट्रॅक्टरला दोरखंड लावून कार बाहेर खेचण्याचा प्रयत्न सुरू आहे. दिल्लीपेक्षाही मोठा हिमनग अंटार्कटिकापासून झाला वेगळा, शास्त्रज्ञांनी दिला इशारा मात्र, ढवळत असलेल्या समुद्राच्या पाण्यामुळे कार बाहेर काढणे जिकिरीचे होत आहे. आज संध्याकाळपर्यंत ही कार बाहेर काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Vasai, वसई

पुढील बातम्या