मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

माथेरानच्या घाटात अपघाताचा थरार, जिप्सी दरीत कोसळणारच होती पण...

माथेरानच्या घाटात अपघाताचा थरार, जिप्सी दरीत कोसळणारच होती पण...

सलग दोन दिवस सुट्ट्या असल्यामुळे थंड हवेचं ठिकाण असलेल्या माथेरानला फिरण्यासाठी राज्यभरातून पर्यटकांनी गर्दी केली आहे.

माथेरान, 24 जानेवारी : रायगड (raigad) जिल्ह्यातील माथेरानच्या (matheran) घाटात एक थरारक अपघाताची घटना घडली. ऐन घाटात नियंत्रण सुटल्यामुळे जिप्सी गाडी दरीत कोसळताना बचावली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. सलग दोन दिवस सुट्ट्या असल्यामुळे थंड हवेचं ठिकाण असलेल्या माथेरानला फिरण्यासाठी राज्यभरातून पर्यटकांनी गर्दी केली आहे. आज सकाळी काही जण हे मारुती जिप्सी कारने घाटातून जात होते. माथेरानला जाण्यासाठी वळणावळणाचे रस्ते आहेत. दस्तुरी नाक्यापर्यंत गाड्या घेऊन जायाला लागतात. पूर्ण घाट उंच असल्यामुळे गाडी चालवणाऱ्याला कसरत करत जावे लागते. घाटातून जात असताना मारुती जिप्सी ड्रायव्हरचा अचानक ताबा सुटला आणि गाडी थेट सुरक्षा कठडावर जाऊन आदळली.  कठड्यावर कार आदळली खरी पण गाडीचे समोरील दोन्ही चाकं दरीत लोंबकाळत होती. वेळीच गाडीत प्रवाशांनी बाहेर उड्या टाकल्या. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. स्थानिकांनी धाव घेऊन प्रवाशांना बाजूला केले. यात प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या होत्या. काही काळ माथेरानच्या घाटात वाहतुकीची कोंडी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त जिप्सी रस्त्याच्या बाजूला केली आहे. घाटातून जात असताना वाहनं सावकाश चालवावे, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या