• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • भरधाव मारुती इको कार महामार्गावरील रेलिंगमध्ये घुसली, इंजिन फुटले ; 1 महिला ठार

भरधाव मारुती इको कार महामार्गावरील रेलिंगमध्ये घुसली, इंजिन फुटले ; 1 महिला ठार

हा अपघात इतका भीषण होता की, कार महामार्गाच्या कडेला असणाऱ्या लोखंडी रेलिंगला धडकल्यानंतर रेलिंग कारच्या आरपार घुसून पाठीमागून बाहेर आली आहे.

  • Share this:
खेड, 03 एप्रिल :  मुंबई गोवा महामार्गावर (Mumbai goa Express way) कळंबणी गावानजीक भरधाव वेगात जाणाऱ्या मारुती इको कारचा (Maruti Eco car) भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात कारमधील एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे तर 4 जण गंभीर जखमी आहे. मुंबईहुन चिपळूणच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या मारुती इको कारचा मुंबई गोवा महामार्गावर आज सकाळी भीषण अपघात झाला. महामार्गाच्या कडेला असणाऱ्या रेलिंग गार्डला कारने जोराची धडक दिली. टीका करणं सोपं, उद्धव ठाकरे होणं कठीण! आव्हाडांचा फडणवीसांना टोला हा अपघात इतका भीषण होता की, कार महामार्गाच्या कडेला असणाऱ्या लोखंडी रेलिंगला धडकल्यानंतर रेलिंग कारच्या आरपार घुसून पाठीमागून बाहेर आली आहे. या धडकेमध्ये कारचे इंजिन देखील फुटले आहे. या अपघातात 1 वृद्ध महिला ठार झाली असून  चार जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून अधिक उपचारासाठी मुंबई येथे हलवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या संवादानंतर टीकेचा भडिमार, कोण काय म्हणालं? कारमधील सर्व जखमी मुंबई ते सावर्डे चिपळूण येथे निघाले होते. गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ थांबली होती. येणाऱ्या जाणाऱ्या वाहनचालक जखमींच्या मदतीला धावून आले. त्यामुळे जखमींना वेळीच रुग्णालयात दाखल करत आले. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे. भुसावळामध्ये रेल्वे यार्डात अग्नितांडव, भंगार सामान जळून खाक दरम्यान, भुसावळ येथे गुडस यार्डसमोर आरओएच डेपोच्या मागील परिसरात भंगार सामानाला शुक्रवारी रात्रीच्या सुमारास अचानक आग लागली होती. या घटनेमुळे रेल्वे परिसरात एकच खळबळ उडाली  होती. आग लागल्यानंतर घटनास्थळी अग्निशमन दलाचे दोन बंब दाखल  झाले होते.  दीड ते दोन तासाच्या प्रयत्नाने अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणण्यात यश आले. नागपूर: कोरोनानं घेतला बापलेकाचा बळी; दोन तासाच्या अंतराने कुटुंबावर दुहेरी आघात आग लागलेल्या परिसरात एका मालगाडीत 21 बोग्यांमध्ये 700 टन कापूस लोड केलेला होता. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळलासुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. तसंच अप-डाउनच्या रेल्वेवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.
Published by:sachin Salve
First published: