पालघर, 24 जानेवारी : अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर (Ahmedabad National Highway) भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर इतर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. या सर्व जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. मुंबईहुन गुजरातकडे लग्नासाठी जाणाऱ्या इको कारच्या मागचा टायर फुटून तोल गेल्याने हा अपघात झाला.
मुंबईतील माहिम परिसरात राहणारे शेख कुटुंब गुजरात वापी या ठिकाणी लग्नासाठी जात होते. त्यावेळी अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील धानीवरीजवळील सुसरी नदीच्या पुलावर इको कारचा टायर फुटला. यानंतर गाडीचा तोल गेल्याने गाडी पलटी झाली.
नायब तहसीलदार आणि तलाठ्यावर वाळू माफियाचा चाकू हल्ला, यवतमाळमधील घटना
दरम्यान, हा अपघात इतका भीषण होता की, यात गाडीचा चक्काचूर झाला. या अपघातात आईसह एका वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. तर सहा जण जखमी झाले आहेत. या गाडीत लहान मुलांसह 10 जण होते.
ENG vs SL : भारत दौऱ्याची 'आठवण', पुढच्याच ओव्हरला बेयरस्टो आऊट
त्यातील नाझनीन शेख (46), मुझेन शेख (1) या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर शाईन नाईक (46), आशिक अली (65), टूबा शेख(6), आतीफा शेख (9), जनाफ शेख(7), जोया शेख(6) आणि ड्रायव्हर अयान नाईक (29) हे सर्व जखमी झाले आहे. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.