हुतात्मा दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली

हुतात्मा दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली

२१ नोव्हेंबर १९५५ साली संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील आंदोलनकर्त्यांवर, मुंबईतील फ्लोरा फाऊंटन परीसरात तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या आदेशावरून बेछूट गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारात १५ आंदोलनकर्ते जागीच ठार झाले तर ३०० हून अधिक आंदोलनकर्ते गंभीर जखमी झाले होते

  • Share this:

मुंबई,21 नोव्हेंबर:   महाराष्ट्रासाठी आजचा दिवस हा 'हुतात्मा दिन' आहे. यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी हुतात्मा चौकात जाऊन हुतात्मांना आदरांजली वाहिली.

२१ नोव्हेंबर १९५५ साली संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील आंदोलनकर्त्यांवर, मुंबईतील फ्लोरा फाऊंटन परीसरात तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या आदेशावरून बेछूट गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारात १५ आंदोलनकर्ते जागीच ठार झाले तर ३०० हून अधिक आंदोलनकर्ते गंभीर जखमी झाले होते. त्यावेळच्या सरकारने केलेल्या या अमानुष हत्याकांडानंतर महाराष्ट्र पेटून उठला आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ अधीक आक्रमक झाली.

पुढे जानेवारी १९५६ साली महाराष्ट्रात विविध ठिकाणी आंदोलनकर्त्यांवर झालेल्या गोळीबारात, आणखी ९० आंदोलनकर्त्ये हुतात्मा झाले. या सर्व हुतात्म्यांच्या बलिदानावरच आजचा महाराष्ट्र निर्माण झालांय. संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील या सर्व १०७ हुतात्म्यांना, आज मुंबईतल्या हुतात्मा चौकातील स्मारकात श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि मुंबईचे महापौर तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थिथीत आज ही सरकारी श्रद्धांजली अर्पण केली जातेय.

तर दुसरीकडे याच महाराष्ट्रात वेगळ्या विदर्भाची मागणी करणाऱ्यांना या १०७ हुतात्म्यांचं विसर पडल्याचंच दिसतंय. वेगळा विदर्भाची मागणी करणारे या १०७ हुतात्म्यांना विसरले असले तरी, बेळगाव आणि निपाणीतील सीमा वासीय मराठी माणसं, आजही संयुक्त महाराष्ट्राचा लढा त्यांच्या विभागात लढत आहेत. त्यांच्या लढ्याला ज्या दिवशी यश मिळेल, त्या दिवशी खऱ्या अर्थाने संयुक्त महाराष्ट्र चळवळ १०० टक्के यशस्वी होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 21, 2017 09:56 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading