हवाई दलाच्या विशेष विमानाने शहीद भूषण सतई यांचे पार्थिव नागपुरात

हवाई दलाच्या विशेष विमानाने शहीद भूषण सतई यांचे पार्थिव नागपुरात

शहीद सतई हे काटोल येथील असून त्यांचे पार्थिव भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानाने येथील सोनेगाव विमानतळावर आणण्यात आले.

  • Share this:

नागपूर, 15 नोव्हेंबर : जम्मू काश्मीरमध्ये सीमेजवळच्या गुरेज सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याला प्रतिउत्तर देताना भूषण रमेश सतई यांना वीरमरण आले आहे. शहीद सतई हे काटोल येथील असून त्यांचे पार्थिव भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानाने येथील सोनेगाव विमानतळावर आणण्यात आले. भारतीय लष्कराच्या विशेष दलाने सन्मानपूर्वक स्वीकारले.

यावेळी विमानतळावर भारतीय वायूदलाचे ग्रुप कॅप्टन कांचनकुमार, एन.सी.सी. कामठीचे कर्नल व बायर लेफ्टनन कर्नल धनाजी देसाई, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ.शिल्पा खरपकर, संरक्षण विभागाचे जनसंपर्क अधिकारी वसंत कुमार पांडे आदी उपस्थित होते.

शहीद भूषण रमेश सतई यांच्या पार्थिवावर कामठी येथील संरक्षण विभागाच्या हॉस्पिटल परिसरात विशेष मानवंदना देण्यात येईल त्यानंतर त्यांच्या मूळ गावी काटोल येथे शासकीय इतमामात अंत्यंसस्कार करण्यात येणार आहे.

शहीद भूषण सतई सहा मराठा बटालियन मध्ये नायक पदावर कार्यरत होते. भारतीय सेनेमध्ये निवड झाल्यानंतर मराठा बटालियन मध्ये रुजू झाले. गेल्या एक वर्षापासुन त्यांची पोस्टिंग जम्मू काश्मीर मध्ये होती. शहीद सतई फैलपुरा काटोल येथे राहत असुन त्यांच्यासोबत वडील रमेश धोडुंजी सतई, आई सौ.सरिता सतई, लहान भाऊ लेखनदास सतई व बहिण कुमारी सरिता सतई आदी परिवार आहे.

Published by: Akshay Shitole
First published: November 15, 2020, 11:51 PM IST
Tags: nagpur

ताज्या बातम्या