मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Extramarital Affair : विवाहित स्त्री-पुरुषाचे जुळले प्रेमसंबंध, कुणालाही न सांगता झाले घरातून फरार आणि...

Extramarital Affair : विवाहित स्त्री-पुरुषाचे जुळले प्रेमसंबंध, कुणालाही न सांगता झाले घरातून फरार आणि...

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

या घटनेतील पुरुष आणि महिला दोन्ही विवाहित होते. महिलेला चार मुले आहेत. तर हा पुरुषही एका गोंडस बाळाचा बाप आहे. या दोन्हींचे एकमेकांसोबत सूत जुळले आणि त्यांनी एकमेकांसोबत घरच्यांना कोणतीही कल्पना न देता पलायन केले. (Extramarital Affair)

पुढे वाचा ...

बीड, 23 मे : लग्न (Marriage) न झालेल्या प्रेमीयुगुल (Couple) पळून गेल्याच्या बातम्या तुम्ही वाचल्या असतील. मात्र, बीडमध्ये एक वेगळीच घटना समोर आली आहे. ही घटना पुरुष आणि स्री या दोन्ही विवाहित (Married) जणांसोबत घडली आहे.

बीडमध्ये नेमकं काय घडलं?

या घटनेतील पुरुष आणि महिला दोन्ही विवाहित होते. महिलेला चार मुले आहेत. तर हा पुरुषही एका गोंडस बाळाचा बाप आहे. या दोन्हींचे एकमेकांसोबत सूत जुळले आणि त्यांनी एकमेकांसोबत घरच्यांना कोणतीही कल्पना न देता पलायन केले. (Extramarital Affair) बीड शहरातील शिवाजीनगर ठाण्यात (Shivajinagar Police Station) हा प्रकार उघडकीस आला. पोलीस ठाण्यात एक महिला आपल्या बाळाला कडेवर घेऊन आली. तर याचवेळी एक तरुणही तिथे आला. महिला हवालदार मीरा रेडेकर यांनी या महिलेची चौकशी केली असता तिने सांगितले की, तिच्या पतीचे पोलीस ठाण्यात आलेल्या या तरुणाच्या पत्नीसोबत प्रेमसंबंध आहेत. तसेच ते दोघेही घरात कुणालाही काहीच न सांगता पळून गेले आहेत.

यावेळी पोलीस ठाण्यात आलेला तो तरुण म्हणाला की, त्यांना चार अपत्ये आहेत. तो हॉटेलात कामाला असल्यामुळे दिवसभर बाहेर असायचा. तर इकडे त्याच्या पत्नीचे पोलीस ठाण्यात आलेल्या महिलेच्या पतीसोबत कधी प्रेमसंबंध जुळले ते त्यालाही समजले नाही. यामुळे त्याने पोलिसांना विनंती केली आहे की, त्याच्या पत्नीचा शोध घेऊन तिला घरी परत आणावे. तसेच दुसरीकडे पोलीस ठाण्यात आलेल्या या महिलेनेही तिच्या पतीच्या त्या दुसऱ्या महिलेपासून सुटका करण्यात यावी, अशी विनंती केली आहे.

हेही वाचा - दारुड्या पतीच्या मारहाणीला कंटाळून पत्नी माहेरी गेली, सासुरवाडीत घडला धक्कादायक प्रकार

दरम्यान, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक केतन राठोड म्हणाले की, अशा प्रकारची कोणतीही तक्रार माझ्यापर्यंत आलेली नाही. याबाबत रविवारी उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद नव्हती, असे त्यांनी सांगितले आहे. तर पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, हे विवाहित प्रेमीयुगुल शहर सोडून गेलेले नाही तर शहरातच ते कुठेतरी खोली घेऊन राहत आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. याप्रकरणी, पोलिसांनी या दोघांना शोधण्यासाठी बेपत्ता झाल्याची नोंद करणे आवश्यक असल्याचे सांगितले. तर विचार करुन तक्रार देऊ, असे पोलीस ठाण्यात आलेल्या महिला व तरुणाने सांगितले. असे सांगून ते दोन्ही पोलीस ठाण्यातून निघून गेले.

First published:

Tags: Women extramarital affair