Home /News /maharashtra /

विवाहित तरुणाचा अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार; कोर्टानं घडवली आयुष्यभराची अद्दल

विवाहित तरुणाचा अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार; कोर्टानं घडवली आयुष्यभराची अद्दल

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

Rape on Minor Girl in Beed: बीड जिल्ह्याच्या केज पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका विवाहित तरुणानं अल्पवयीन मुलीला पळून नेऊन तिच्यासोबत वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी न्यायालयाने आरोपीला कठोर शिक्षा सुनावली आहे.

पुढे वाचा ...
केज, 15 मार्च: बीड (Beed) जिल्ह्याच्या केज (Kej) पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका विवाहित तरुणानं अल्पवयीन मुलीला पळून नेऊन तिच्यासोबत वारंवार बलात्कार (Married man raped minor girl) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचं माहीत असताना देखील आरोपीनं तिच्या अज्ञानाचा फायदा घेऊन तिला नरक यातना दिल्या होत्या. या प्रकरणी अंबाजोगाईच्या अप्पर सत्र न्यायालयानं आरोपीला आयुष्यभराची अद्दल घडवली आहे. न्यायालयात सादर केलेल्या साक्षीदार आणि पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपीला दहा वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा दिली आहे. न्यायाधीश श्रीमती एस. एस. सापटणेकर यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. अशोक मारुती सरवदे असं शिक्षा झालेल्या आरोपीचं नाव आहे. आरोपी सरवदे हा केज तालुक्यातील साबळा येथील रहिवासी आहे. तो विवाहित असूनही त्यानं पीडित अल्पवयीन मुलीला लग्नाचं आमिष दाखवून दोन वेळा पळवून नेलं होतं. पहिल्यांदा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याची जामीनावर सुटका करण्यात आली होती. पण जामिनावर बाहेर येताच आरोपी सरवदे यानं पीडित मुलीला पुन्हा पळवून नेलं होतं. पीडितेला पळवून घेऊन जात आरोपी तिच्यासोबत नवरा बायकोसारखं राहत होता. हेही वाचा-मधुचंद्राच्या रात्रीच तुटलं लग्न; नवरीने केला मोठा खुलासा, जाणून हादरला पती पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचं माहीत असून देखील आरोपीनं तिच्यासोबत वारंवार लैंगिक संबंध ठेवले होते. विशेष म्हणजे आरोपी विवाहित असून त्याला दोन मुलं देखील होते. असं असताना देखील आरोपीनं पीडितेसोबत वारंवार बलात्कार केला होता. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी कसून तपास करत आरोपीला अटक केली होती. त्यानंतर आरोपीला तुरुंगात ठेवूनच हा खटला न्यायालयात गेला होता. हेही वाचा-हुक्का पार्टीत अश्लीलतेचा नंगानाच, 18 वेश्यांसोबत भलत्याच अवस्थेत आढळले 52 तरुण या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले. तसेच सरकारी वकिलाकडून अनेक पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले होते. दोन्ही पक्षाच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर आणि साक्षी पुराव्यांची पडताळणी केल्यानंतर अंबाजोगाईच्या अप्पर सत्र न्यायालयानं दोषी तरुणाला दहा वर्षांचा सश्रम कारावास सुनावला आहे. हा महत्त्वपूर्ण निकाल न्यायाधीश श्रीमती एस. एस. सापटणेकर यांनी दिला आहे.
Published by:News18 Desk
First published:

Tags: Beed, Court, Rape on minor

पुढील बातम्या