जि.प. शाळेच्या मुख्याध्यापकाला चोप, चौथीच्या मुलींशी करत होता अश्लील चाळे

जि.प. शाळेच्या मुख्याध्यापकाला चोप, चौथीच्या मुलींशी करत होता अश्लील चाळे

कन्नड तालुक्यातल्या चिंचोली लिंबाजी येथे जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मुख्याध्यापकाला गावकऱ्यांनी चांगलाच चोप दिला. तो शाळेतील लहान मुलींशी अश्लील चाळे करत असल्याची संतापजनक माहिती समोर आली आहे.

  • Share this:

सिद्धार्थ गोदाम, (प्रतिनिधी)

औरंगाबाद, 17 ऑगस्ट- कन्नड तालुक्यातल्या चिंचोली लिंबाजी येथे जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मुख्याध्यापकाला गावकऱ्यांनी चांगलाच चोप दिला. तो शाळेतील लहान मुलींशी अश्लील चाळे करत असल्याची संतापजनक माहिती समोर आली आहे. नागोराव कोंडीबा काकळे असे नराधमाचे नाव असून त्याला स्वातंत्र्यदिनाच्या झेंडावंदनाच्या कार्यक्रमानंतर गुरुवारी (15 ऑगस्ट) अटक करण्यात आली.

'ती' एकटीच नव्हे तीन मुली आल्या समोर..

पीडित मुलगी चौथीत आहे. मुलींचा प्रश्न म्हणून काही पालकांनी या प्रकाराकडे दुर्लक्ष केले. मागील पंधरा दिवसांपासून मुलगी शाळेत जाण्यास घाबरत होती. ती कायम दहशतीत वावरत होती. पालकांनी तिली धीर दिला असता तिने पालकांना हा गंभीर प्रकार कथन केला. मुख्याध्यापकाच्या लैंगिक छळाला पीडिता एकटीच बळी पडली नसून तीन मुलींनी समोर येऊन नराधम मुख्याध्यापकाने त्यांच्यासोबतही असे कृत्यचे केल्याचे सांगितले.

संतप्त गावकऱ्यांनी दिला चोप..

संतप्त गावकऱ्यांनी मुख्यध्यापक नागोराव कोंडीबा काकळे याला चांगलाच चोप दिला. शाळेत तनावपूर्ण परिस्थिती निर्माण होताच पोलीस पाटील निलेश बलसाने यांनी घटनेची माहिती पिशोर पोलिसांना दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश पवार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. नराधम मुख्यध्यापकास अटक केली. एकीकडे 'देश बेटी बचाव बेटी पाढाव'ची जनजाग्रृती करत असताना ज्ञानमंदिरातच असा प्रकार घडल्याने येथील गावकऱ्यांनी शाळेला कुलूप ठोकले आहे. नराधमावर ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत शाळा बंद राहील, असा पावित्रा गावकऱ्यांनी घेतला आहे.

डॉन आहे का तू? पोलिसांनी तरुणाला पट्ट्याने झोड-झोडपलं, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 17, 2019 01:25 PM IST

ताज्या बातम्या