गणपती विसर्जन मिरवणुकीत चोरीला गेला मोबाइल, तरुणाने केली आत्महत्या

गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत ढोल वाजवणाऱ्या तरुणाचा 10 हजार रुपयांचा मोबाइल चोरीला गेल्याने त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

सुरेश जाधव सुरेश जाधव | News18 Lokmat | Updated On: Sep 13, 2019 04:24 PM IST

गणपती विसर्जन मिरवणुकीत चोरीला गेला मोबाइल, तरुणाने केली आत्महत्या

बीड, 13 सप्टेंबर: गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत ढोल वाजवणाऱ्या तरुणाचा 10 हजार रुपयांचा मोबाइल चोरीला गेल्याने त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आकाश गौतम वडमारे (वय-23) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. महागडा मोबाइल चोरीला गेल्याचा धक्का सहन न झाल्याने त्याने गुरुवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास गळफास घेऊन जीवन संपवले. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

बीड शहरातील बलभीम चौक परिसरात राहणारा आकाश हा ढोल वाजवण्याचे काम करत होता. बुधवारी शहरांमध्ये गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये ढोल वाजवत असताना अज्ञात चोरट्याने आकाशच्या खिशातील दहा हजार रुपयांचा मोबाइल चोरला. यामुळे आकाशने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आत्महत्या झाल्याची नोंद झाली आहे. पोलिस मोबाइल चोरांचा शोध घेत आहेत. गणेशोत्सवाच्या काळात अनेकांच्या मोबाइलवर चोरट्यांनी डल्ला मारला. दरम्यान, मोबाइल चोरीला गेल्याच्या क्षुल्लक कारणांमुळे स्वतःला संपवून घेणे धक्कादायक आहे. मोबाइलच वाढते प्रेम जिवघेणे ठरू शकते, हे या घटनेने दाखवून दिले आहे. मात्र, मोबाईल चोरीला गेल्यामुळे आत्महत्या केल्यामुळे चर्चेचा विषय ठरला आहे.

गोदावरीत वाहून गेलेल्या तिघांची शोध सुरू..

दरम्यान, नांदेड येथे गोदावरी नदीत तिघे वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. शोधकार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. तिघेही उत्तर प्रदेशातील रहिवाशी आहेत. नांदेडमध्ये बांधकाम करत होते. अरविंद हरगून निशाद(वय-19), रामनिवास निशाद (वय-20), रमेश घरमंडरा (वय- 17) अशी वाहून गेलेल्या तरुणांची नावे आहेत. ठेकेदाराने पोलिसांत तक्रार दिल्याने ही घटना समोर आली आहे.

VIDEO: दारूच्या अड्ड्यावर छापा टाकणाऱ्या पोलिसालाच महिलांनी केली मारहाण

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 13, 2019 04:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...