जायकवाडीच्या पायथ्याशी घेतलेला 'सेल्फी' ठरला शेवटचा, गोदावरीत तरून बुडाला

जायकवाडीच्या पायथ्याशी घेतलेला 'सेल्फी' ठरला शेवटचा, गोदावरीत तरून बुडाला

पैठण येथील जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी असलेल्या जलविद्युत केंद्रालगत सेल्फी घेतताना तोल गेल्याने गोदावरी नदीत बुडून एका तरूणाचा मृत्यू झाला आहे.

  • Share this:

सचिन जिरे,(प्रतिनिधी)

औरंगाबाद,30 सप्टेंबर: पैठण येथील जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी असलेल्या जलविद्युत केंद्रालगत सेल्फी घेतताना तोल गेल्याने गोदावरी नदीत बुडून एका तरूणाचा मृत्यू झाला आहे. असिफ जैनुद्दीन शेख (रा. शेवगाव) असे तरूणाचे नाव असून तो रविवारी दुपारी चार वाजेपासून बेपत्ता होता.

आज, सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास असिफ शेखचा मृतदेह शोधण्यात बचाव यंत्रणेला यश आले आहे. सध्या जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून धरणाच्या सोळा दरवाज्यातून गोदापात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे गोदावरी नदी दुथडी वाहत आहे. धरणातून गोदापात्रात सोडलेले पाणी पाहण्यासाठी बाहेर गावाहून व परिसरातून आलेल्या पर्यटकाची धरणावर मोठी गर्दी होत आहे.

असिफ जैनुद्दीन शेख हा रविवारी दुपारी शेवगावहून मित्रांसोबत पर्यटनासाठी आला होता. धरणाच्या पायथ्याशी असलेल्या जलविद्युत केंद्राजवळ (हायड्रो) सेल्फी घेण्याच्या नादात तोल गेल्याने पाण्यात पडला. यावेळी पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने तो वाहून गेला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाचे जयसिंग सांगळे, खलिल धांडे, औरंगाबाद मनपा अग्निशमन दलाच्या पथकाने रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम राबविली. मात्र असिफ शोध लागला नाही. दुसऱ्या दिवशी शोध यंत्रणेला मृतदेह शोधण्यात यश मिळाले.

VIDEO:मी ब्ल्यू फिल्म करत नाही, राज ठाकरेंची टोलेबाजी

Published by: Sandip Parolekar
First published: September 30, 2019, 5:45 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading