पिशोरी, 01 मार्च: गेल्या बऱ्याच काळापासून मराठावाडा आणि शेतकरी आत्महत्या (Farmer Suicide) हे समीकरणच जुळलं आहे. सततचा दुष्काळ (Drought) आणि यावर्षी झालेली अतिवृष्टी (Heavy rain) यामुळे कुटुंबीयांच्या डोक्यावर झालेल्या कर्जाची (Loan) परतफेड कशी करायची, या चितेंतून आता आणखी एका शेतकऱ्याने मृत्यूला (Death) कवटाळलं आहे. त्याच्या निधनानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद जिल्ह्यातील शफेपूर येथे राहणाऱ्या 35 वर्षी शांताराम मनोज वाघ (Shantaram Manoj Wagh) यांनी आत्महत्या केली आहे. गेल्या वर्षांपासून सतत पडणारा दुष्काळ आणि यावर्षी झालेली अतिवृष्टी यामुळे शांताराम यांच्या शेती मालाचं प्रचंड नुकसान झालं होतं. दरम्यान त्यांच्यावर सोसायटीचं 28 हजारांचं आणि कुटुंबीयांनी बॅंककडून घेतलेलं 60 हजार रुपयांच्या कर्जाचं ओझं होतं. निसर्गाच्या प्रकोपामुळे शेतीत काहीचं पिकलं नाही, जे काही पिकलं ते अतिवृष्टीने हिरावून नेलं.
त्यामुळे कुटुंबीयाच्या डोक्यावरील कर्ज कसं फेडायचं हा घोर 35 वर्षीय शांताराम यांना लागला होता. याच चिंतेतून शांताराम यांनी शफेपूर येथील खडकी शिवारात असणाऱ्या आपल्या वडीलांच्या शेतीतील एका लिंबाच्या झाडाला दोरखंडाने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. त्यांच्या या आत्महत्येनं परिसरातील अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. शांताराम वाघ यांच्या पश्चात वयोवृद्ध आई- वडील, पत्नी, दोन मुलं, एक भाऊ आणि बहीण असा परिवार आहे.
हे ही वाचा -Black Magic: पैशाचा पाऊस पाडण्याचं दाखवलं आमिष, मुलीसोबत केलं असं काही की...
स्थानिक पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद करून घेतली आहे. शवविच्छेदनानंतर पोलिसांनी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. यानंतर रविवारी सायंकाळी पाच वाजता त्यांच्यावर शफेपूर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aurangabad, Farmer, Suicide