सात बहिणींच्या लग्नासाठी वडिलांनी घेतलेले कर्ज फेडता आले नाही, तरुण भावाची आत्महत्या

सात बहिणींच्या लग्नासाठी वडिलांनी घेतलेले कर्ज फेडता आले नाही, तरुण भावाची आत्महत्या

सात बहिणीच्या लग्नासाठी वडिलांनी घेतलेले कर्ज फेडता आले नाही. मागच्या वर्षी वडील आजारपणात गेले.

  • Share this:

बीड,29 डिसेंबर: सात बहिणीच्या लग्नासाठी वडिलांनी घेतलेले कर्ज फेडता आले नाही. मागच्या वर्षी वडील आजारपणात गेले. दोन वर्षांपूर्वी इंडिया बँकेचे घेतलेले कर्ज कसं फेडायचे, कुटुंब कसं चालवायचे, या विवंचनेत असलेल्या 30 वर्षीय शेतकर्‍याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना वडवणी तालुक्यातील चिंचवडगाव येथे समोर आली. किसन दौलतराव घुगे असे आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याचे नाव आहे.

पाच एकर शेतात दुष्काळात काहीच पिकले नाही. यावर्षी कापूस जास्तीच्या पावसाने पूर्णपणे जळून गेला. दोन वर्षांपूर्वी वडवणी येथील इंडिया बँकेचे कर्ज घेतले होते. हे कर्ज कसं फेडायचे, या चिंतेतून रात्री त्यांनी स्वत:च्या घरात गमचाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. रात्री जेवण करून ते व पत्नी वेगळ्या रुममध्ये झोपले होते. रात्री साडे दहा वाजता पती दरवाजा उघडत नसल्याचे पाहून त्यांची पत्नी राधाबाई घुगे यांनी खिडकीतून पाहिले असता त्यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. तेव्हा हंबरडा फोडला. घरातील कर्ता पुरुष निघून गेल्याने घरात फक्त महिलाच राहिल्यात सात बहिणीच्या पाठीवर जन्मलेल्या एकुलत्या एक भावाने आत्महत्या केल्याने बहिणींवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दोन वर्षा पूर्वी आईचे निधन झाले ऐक वर्षा पूर्वी वडील आजारपनात मरण पावले.आत्ता भावाने आत्महत्येचे पाऊल उचलले यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

अपघात पाहायला गेलेल्या महिलाचा अपघातात मृत्यू

रस्त्यावर झालेला अपघात पाहायला गेलेल्या महिलेला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यू झाला. सुरेखा सीताराम पालवे (38) असे मृत महिलेचे नाव आहे. वाहनाने धडक दिल्याने त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. ही घटना गेवराई तालुक्यातील मादळमोही-सावरगाव रस्त्यावर घडली. रिक्षाचा अपघात झाल्याचे पाहण्यासाठी सुरेखा पालवे रस्त्यावर गेल्या होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 29, 2019 10:56 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading