पण तुला मारायचं नव्हतं...! धारदार शस्त्रानं माय-लेकीवर केले सपासप वार

हल्ल्यात आई-मुलगी गंभीर जखमी, रुग्णालयात उपचार सुरू.

  • Share this:

औरंगाबाद, 02 जानेवारी: रस्त्यावरून पायी चालत जाणाऱ्या आई-मुलीवर दुचाकीवरून येणाऱ्या दोघांनी धारदार शस्त्रानं हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये माय-लेकी दोघीही गंभीर झाल्या असून त्यांच्यावर सोयगाव इथे उपचार सुरू आहेत. दुचाकीवरून तोंडाला रुमाल बांधून आलेल्या दोन अज्ञातांनी भररस्त्यात महिलेवर हल्ला केला. आईवर हल्ला होत असल्याचं पाहून मुलगीमध्ये आली आणि तिच्यावरी हल्ला करण्यात आला. माळेगाव पिंपरी येथील सविताबाई मंगलदास अहिरे आणि मुलगी मुलगी आकांक्षा मंगलदास अहिरे दोघंही गंभीर जखमी झाले आहेत.

दागिने लंपास करण्याच्या हेतून हल्ला करण्यात आल्याचा कयास लावला जात होता. मात्र हा चोरीचा प्रयत्न नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. महिलेनं दिलेल्या जबाबानुसार आरोपीनं वार केल्यानंतर 'तू होतीस का? पण मला तुला मारायचे नव्हते असं आरोपीनं म्हटलं.' काही कळण्याआतच आरोपी सपासप वार करून पसार झाला.

हेही वाचा-दाम्पत्यात झालं कडाक्याचं भांडण, पत्नी माहेरी जाताच पतीनं कापलं स्वत:चं गुप्तांग

दरम्यान स्थानिकांनी घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी अज्ञातांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र आरोपींना पळून जाण्यात यश मिळालं. स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली असून पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक सीताराम म्हेत्रे, सहा. पोलिस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आहे. पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी नाकाबंदी केली आहे.

आरोपी दागिन्यांसाठी नाही तर बदला घेण्याच्या हेतूनं आला होता का? आरोपीकडून आणखी कुणाच्या जीवाला धोका असू शकतो? यासंदर्भात पोलिसांकडून सध्या तपास सुरू आहे. आरोपी पोलिसांच्या नाकाबंदीनंतरी आरोपी फरार आहेत. पोलिसांकडून तपास सुरू आहे.

हेही वाचा-'रेप नहीं प्यार था मीलॉर्ड..', मूकबधीर आरोपीची कोर्टाने केली निर्दोष मुक्तता

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 2, 2020 03:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading