झाला होता प्रेमविवाह... 6 वर्षाच्या मुलीसमोरच पत्नीने केला उद्योजक पतीचा खून

झाला होता प्रेमविवाह... 6 वर्षाच्या मुलीसमोरच पत्नीने केला उद्योजक पतीचा खून

पोलिसांनी चौकशी सुरू केल्यानंतरही पूजा काहीच बोलत नव्हती. ती एवढेच म्हणाली, तुम्ही शैलेंद्रलाच विचारा....

  • Share this:

औरंगाबाद,19 सप्टेंबर:उच्चभ्रू समजल्या उल्कानगरीत 6 वर्षांच्या मुलीसमोरच मांडीत चाकू खुपसून पत्नीने आपल्या उद्योजक पतीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शैलेंद्र शिवसिंग राजपूत (वय-40) असे हत्या झालेल्या उद्योजकाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (16 सप्टेंबर) मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास घडली.

काय आहे प्रकरण...?

उल्कानगरीतील अत्यंत आलिशान अशा 'खिंवसरा पार्क'मध्ये फ्लॅट क्रमांक 702 मध्ये राजपूत कुटुंब राहते. उद्योजक शैलेंद्र यांचा मोठा भाऊ सुरेंद्र, भारत यांची हिरा पॉली प्रिंट प्रा. लि. ही कंपनी आहे. तिघेही भाऊ एकत्र राहत होते. शैलेंद्र आणि पूजा यांना दोन मुली असून थोरली सोळा तर धाकटी सहा वर्षांची आहे. मात्र, पूजामुळे शैलेंद्रने वेगळे राहण्याचा निर्णय घेतला होता. शैलेंद्र सोमवारी रात्री 11.30 च्या सुमारास घरी परतले. त्यांचे पत्नी पूजाशी पुन्हा कडाक्याचे भांडण झाले. संतापलेल्या पूजाने स्वयंपाक घरात जाऊन चाकू आणला आणि आपल्या सहा वर्षांच्या मुलीसमोरच पतीची निर्घृणपणे हत्या केली. आईने आपल्यासमोर बाबांचा खून केल्याचे पाहून दोन्ही मुली प्रचंड भेदरल्या. जवाहरनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपी पूजाला ताब्यात घेतले. पोलिसांनी चौकशी सुरू केल्यानंतरही पूजा काहीच बोलत नव्हती. ती एवढेच म्हणाली, तुम्ही शैलेंद्रलाच विचारा. पूजाचे हे उत्तर ऐकून पोलिसही चक्रावले आहेत. या भयंकर घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.

2002 मध्ये वर्षांपूर्वीच झाला होता प्रेमविवाह...

शैलेंद्र व पूजा यांचा 2002 मध्ये प्रेमविवाह झाला होता. परंतु लग्नाच्या काही वर्षांनंतरच त्यांच्यात सतत वाद होत होते. चार वर्षांपूर्वी पूजाने पतीविरोधात छळाची तक्रार दिली होती. काही महिन्यांपूर्वीच पूजाने पतीच्या अंगावर उकळते पाणी टाकले होते.

Loading...

पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न..

पती रक्ताच्या थारोळ्यात पडला असताना पूजा अतिशय शांतपणे बाथरूममध्ये जाऊन बादलीत पाणी आणले. बेडरूम व स्वयंपाकघरात पडलेले रक्त तिने पुसले. नंतर दोन बादल्या पाणी भरून खोलीतील रक्त धुऊन काढले. त्यानंतर रक्ताने भरलेल्या चाकू टर्किश टॉवेलमध्ये गुंडाळून बादलीत ठेवून दिला. चौकशीवेळी पूजाने बादलीतील चाकू काढून दिला आहे.

VIDEO: उदयनराजेंनी साताऱ्याची पगडी घालून मोदींचं केलं स्वागत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 19, 2019 04:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...