मराठी दिन विशेष : ब्राझीलच्या या लेकींचं ठसकेबाज मराठी ऐकून तोंडात घालाल बोटं

मराठी दिन विशेष : ब्राझीलच्या या लेकींचं ठसकेबाज मराठी ऐकून तोंडात घालाल बोटं

ब्राझीलमधून स्टुडंट एक्सचेंज कार्यक्रमातून आलेल्या या दोघी मराठमोळ्या कुटुंबात छान रमल्या.

  • Share this:

औरंगाबाद, 27 फेब्रुवारी औरंगाबादच्या वरकड कुटुंबात राहून लेटेशिया आणि मेलिना या दोघींनी मराठी संस्कृती आणि मराठी भाषा शिकल्या... त्यांचं मराठी ऐकून सध्या औरंगाबादकर तोंडात बोटं घालत आहेत. विद्यार्थी संस्कृती आदन-प्रदान कार्यक्रमाच्या अंतर्गत (स्टुडंट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम) ब्राझीलच्या या दोघी भारतात आल्या आहेत. आज मराठी दिनाच्या निमित्ताने पाहूयात, या खास गप्पा....

लेटेशिया आणि मेलिना काही काळ साताऱ्यातल्या वाई इथे राहिल्या. आता औरंगाबादमध्ये आहेत. मराठीची प्राथमिक माहिती घेतल्यानंतर या आणखी काही दिवस महाराष्ट्रात राहणार आहेत. वरकड कुटुंबीयांनी सुद्धा त्यांना छान सामावून घेतलं आहे. लेटेशिया आणि मेलिना आरत्या शिकल्या, मराठी पद्धतीचं आगत-स्वागत इतकंच नाही तर मराठी पद्धतीचा स्पयंपाक सुद्धा शिकल्या आहेत. इतकंच नाही तर यातल्या मेटेशियाचं नामकरण सुद्धा करण्यात आलं आहे.

--------------------

अन्य बातम्या

First published: February 27, 2020, 6:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading