बुलडाणा, 11 जून : जगातल्या मोठ्या खाऱ्या पाण्याच्या सरोवरांमध्ये समावेश असलेल्या लोणारच्या सरोवराचं पाणी अचानक लाल-गुलाबी दिसू लागलं आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. उल्कापातामुळे निर्माण झालेलं हे सरोवर जगभरातल्या भूगर्भ संशोधकांचा आणि भूगोल अभ्यासकांचा औत्सुक्याचा विषय आहे. अचानक निळ्या-हिरव्या सरोवराच्या पाण्याने रंग बदलल्याने भीतीमिश्रित आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
पाण्याचा रंग बदलल्याचं लोणारच्या तहसीलदारांनीही मान्य केलं आहे. "गेल्या दोन-तीन दिवसांत पाण्याचा रंग बदलल्याचं जाणवत आहे. वनविभागाला या ठिकाणची सँपल्स घ्यायला सांगितलं आहे. त्यांच्या तपासणीनंतरच यामागचं कारण कळू शकेल", अशी माहिती तहसीलदार सैफन नदाफ यांनी दिली.
सरोवराचा रंग कसा बदलला याबद्दल प्रशासन आणि सरोवर समितीमध्ये मतभिन्नता आहे. पण लॉकडाऊनचे नियम शिथिल झाले आणि त्यात सरोवराचं लाल झालेलं पाणी पाहायला इतके दिवस शांत असलेल्या लोणार परिसरात गर्दी झाली आहे. जगप्रसिद्ध लोणार सरोवराचे पाणी अचानक गुलाबी झाल्याने लोणार मधील हजारो नागरिकांनी सरोवराचे हे गुलाबी रूप पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. हिरवे आणि निळे दिसणारे सरोवराचे पाणी गुलाबी झाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले तर याबाबत अनेकांच्या मनात कुतूहलसुद्धा निर्माण झाले.
कोरोना विषाणूमुळे गेले तीन महिन्यांपासून लाॅकडाउन असल्यामुळे सरोवर परिसरात कोणीही अभ्यासक फिरकलेला नाही. गेल्या आठवड्यात निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या पावसामुळे परिसरात गारवा निर्माण झाला. लॉकडाउनमध्येही थोडी ढिल दिल्यामुळे नागरिक सरोवर परिसरात फिरू लागले आहेत. मात्र गेल्या दोन दिवसांपासून सायंकाळी फिरताना लोणार सरोवरातील पाण्याचा रंग लाल झाल्याचं दिसत आहे. यामुळे परिसरात फिरणारे नागरिक मोबाईलमध्ये याचं चित्रण करण्यात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. याबाबत प्रशासन आणि सऱोवर समितीच्या सदस्यांमध्ये मतभिन्नता आहे.
पाण्याचा रंग कशामुळे बदलला हे अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी प्रशासन आणि सरोवर समितीच्या सदस्यांमध्ये याबाबत मतभिन्नता आहे. हा रंग गुलाबी का दिसतो याबाबत संशोधन होण्याची गरज आहे.
Maharashtra: Water of Lonar crater lake in Buldhana district has turned red. Saifan Nadaf, Lonar tehsildar says, "In the last 2-3 days we have noticed that the colour of lake's water has changed. Forest Dept has been asked to collect a sample for analysis & find out the reason". pic.twitter.com/c19zPRIZpS
— ANI (@ANI) June 10, 2020
बुलडाणा जिल्ह्यातील लोणार बेसॉल्ट खडकापासून बनलेलं जगातलं एकमेव खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. उल्कापातातून याचा जन्म झाला. या खाऱ्या पाण्याच्या सरोवर परिसरात असलेल्या मातीमध्ये चुंबकीय गुणधर्म आहेत. चंद्रावरील मातीचं खाऱ्या पाण्याच्या गुणधर्माशी जवळचं नातं आहे, असं जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या संशोधनातून सिद्ध झाले आहे. या सरोवराचा विविध अंगांनी अभ्यास करण्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून येथे संशोधक नेहमी येतात.
अन्य बातम्या
राज्यात उद्याच दाखल होणार मान्सून; कुठल्या भागात कधी पडणार सरी?
जुलै महिन्यात येणार ‘COVID-19’वर औषध? Johnson & Johnson करणार माणसांवर प्रयोग
दुडूदुडू धावणाऱ्या गोंडस मुलाचा हा VIDEO नीट पाहा, काळजाचा चुकेल ठोका
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.