नांदेडकरांवरचं पाणी टंचाईचं विघ्न दूर, विष्णुपुरी धरण 'ओव्हर फ्लो'!

पावसाळा सुरु होऊन तीन महीने उलटले तरी नांदेड जिल्ह्यात म्हणावा तसा पाऊस झला नव्हता. गेल्या दोन दिवसांपासून मात्र परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली.

News18 Lokmat | Updated On: Sep 2, 2019 08:33 PM IST

नांदेडकरांवरचं पाणी टंचाईचं विघ्न दूर, विष्णुपुरी धरण 'ओव्हर फ्लो'!

मुजीब शेख, नांदेड 2 सप्टेंबर : गणरायाच्या आगमनासोबतच नांदेडकरांवरचं पाणी टंचाईचं विघ्न दुर झालंय. गेल्या दोन दिवसापासुन जिल्ह्यात आणि विष्णुपूरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झालाय. त्यामुळे धरण 100 टक्के भरलंय. अजुनही पाण्याची आवक सुरु असल्याने विष्णुपुरी धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता आहे. गेल्या 20 वर्षानंतर नांदेडकरांवर भीषण पाणी टंचाईचं संकट निर्माण झालं होतं. विष्णुपुरी धरण कोरडेठाक पडलं होतं.

शहराला 10 दिवसाआड पाणी पुरवठा केला जात होता. पावसाळा सुरु होऊन तीन महीने उलटले तरी नांदेड जिल्ह्यात म्हणावा तसा पाऊस झला नव्हता. गेल्या दोन दिवसांपासून मात्र परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली. धरणाच्या वरच्या बाजुला देखील मोठा पाउस झाला. त्यामुळे पाण्याची आवक वाढून धरण 100 टक्के भरलं. धरण भरल्याने आता नांदेडला तीन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय पालीकेने घेतल्याची माहिती सिंसन विभागाचे उप अभियंता बी.एस. गव्हाणे यांनी दिलीय.

हरतालिका विसर्जन जीवावरच बेतलं

हिंगणघाट येथे हरितालिका गौरी विसर्जन करताना तोल जाऊन दोन महिला आणि दोन लहान मुलं असे चार जण वणा नदी पात्रात बुडाल्याची  घटना दुपारी घडली. यात पोलीस कर्मचारी तातडीनं मदतीला धावल्याने वाहून जात असलेल्या एका महिलेला पोलीस कर्मचाऱ्यान बाहेर काढलं. मात्र डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केलं तर एक महिला व दोन लहानगे असे तिघे बेपत्ता आहेत. एनडीआरएफच्या मदतीने त्यांचा शोध घेतला जातोय. घटनास्थळी पोलीस,आमदार व जिल्हाधिकारी दाखल झाले आहे.

प्रियकरासमोरच प्रेयसीचा शॉक लागून मृत्यू

Loading...

आज दुपारी पावणे दोन वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. घरी गौरी पूजन करून शास्त्री वार्डातील काही महिला वणा नदी रेल्वे पुलाजवळ  कवडघाट घाटावर गौरी विसर्जन करण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांच्यासोबत दोन मुलंही होती.  विसर्जन करताना एक मुलगी पाय घसरून पाण्यात पडला. तो वाहून जात असताना त्याची बहिणही त्याला वाचवण्यासाठी नदीपात्रात गेली. तीला वाचवण्यासाठी त्यांच्या आईने नदीत उडी घेतली आणि त्यांना वाचवण्यासाठी दुसऱ्या एका महिलेने वाचविण्यासाठी पाण्यात गेल्या. या प्रयत्नात सर्वच जण वाहून गेले.

रिया रंजित भगत ( 35) यांच्या सोबत अभी ( 10) व अंजना ( 13)  ही दोन मुलं सोबत होती.  आई सोबत नदीपात्रात गेलेला अभी वाहू लागल्याने बहीण अंजना त्याला वाचविण्यासाठी धावली तीही पाण्यात बुडत असल्याचे दिसताच तिची आई रिया भगत ने धाव घेतली. या तिघांना वाहताना पाहून शेजारच्या दिपाली मारोती भटे यांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला परंतु ती सुद्धा पाण्यात वाहू लागली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 2, 2019 08:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...