Covid-19 ची लस घेतल्याच्या 2 आठवड्यांनंतर जिल्हाधिकारी कोरोना पॉझिटिव्ह

Covid-19 ची लस घेतल्याच्या 2 आठवड्यांनंतर जिल्हाधिकारी कोरोना पॉझिटिव्ह

कोरोना झाल्यानंतर ही पूर्णपणे सुट्टी घेणार नसून शासकीय कामे रखडू नये यासाठी वर्क फ्रॉम होम म्हणजे घरातून काम करणार आहेत.

  • Share this:

उस्मानाबाद, 21 फेब्रुवारी : कोरोनाची लस घेतल्याच्या 2 आठवड्याने उस्मानाबाद जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या ते होम क्वारंटाइन असून घरीच उपचाप घेत आहेत. या महिन्याच्या सुरुवातील जिल्हाधिकाऱ्यांनी कोवॅक्सिन लशीचा पहिला डोस घेतला होता. त्यातच त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

यानंतर त्यांनी संपर्कात आलेल्या सर्वांना होम क्वारंटाइन होण्याचं व काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. जिल्हाधिकारी यांची प्रकृती स्थिर असून ते कोरोना झाल्यानंतर ही पूर्णपणे सुट्टी घेणार नसून शासकीय कामे रखडू नये यासाठी वर्क फ्रॉम होम म्हणजे घरातून काम करणार आहेत. जिल्हाधिकारी यांना अंगात ताप असल्याने डॉक्टरांनी कोरोना चाचणीचा सल्ला दिला होता, त्यानुसार चाचणी केल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्राथमिक तपासणी व उपचाराची दिशा ठरवून दिल्यानंतर ते आता विलगिकरणात आहेत.

जिल्हाधिकारी यांनी लिहिलेल्या संदेशानुसार, मागील काही दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयांमधील गर्दी प्रचंड वाढली. लोक मास्क न घालता गर्दी करत. आपण त्यांना सांगितल्यावर मास्क लावत. पण माझ्याबाबतीत तोवर व्हायचा तो परिणाम झालाच असे म्हणावे लागेल. त्यामुळे 'नो मास्क नो एन्ट्री' मास्क तोंडावरून खाली ओढून बोलणे यावर कडक कार्यवाही आवश्यक आहे . मी दोन आठवड्यापूर्वी लस घेतली आहे. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. पण कोरोना विरुद्ध पूर्ण क्षमता तयार होण्यास दुसरा डोस आणि त्यानंतर काही दिवस लागतात.

हे ही वाचा-मुंबईकरांनो सावधान! नियम पाळाच, महापालिकेने मोडले आहेत कारवाईचे सर्व रेकॉर्ड

हे सर्व पाहता आपण सर्व फ्रंट लाईन वर्कर्स जसे की महसूल, आरोग्य, पोलीस यांनी अत्यंत सावध राहा. कोणतेही लक्षण अंगावर न काढता तपासणी करून घ्या असे आवाहन केले आहे. पुढे ते म्हणाले की, मला आनंद आहे की, उस्मानाबाद जिल्ह्यात मागील 6 महिन्यात ज्या सोयी सुविधा आपण शासकीय रुग्णालयांत निर्माण केल्या त्याचाच लाभ मलाही मिळत आहे. मागील आठवडाभरात आपण कोविडच्या दुसऱ्या लाटेसाठी तयारी सुरू केली आहे. अँटीजन किट्स, N95, नवीन ऑक्सीजन सिलेंडर, नवीन 200 ऑक्सीजन लाईन, 2D इको व इतर नवी यंत्रसामग्री याबाबत नियोजन केलेले आहे. 960 CCC बेड्सची सुविधा पुनःस्थापित करण्याचे काम वेगात सुरू करावे. लक्षणे असणाऱ्या सर्व व्यक्तींची चाचणी, विलगीकरण, कॉन्टॅक्ट ट्रेसींग ही प्रक्रिया वेगात राबवायची आहे. लोकांनी कोणतेही लक्षण अंगावर काढू नये यासाठी सरकारी खाजगी हॉस्पिटल्स व सर्वांनीच जनजागृती केली पाहिजे.

कोरोनाची लागण झाली असली तरी जिल्हाधिकारी पूर्ण सुट्टी न घेता वर्क फ्रॉम होम करणार आहे. महत्वाच्या विषयात खोळंबा होऊ नये यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे. आपण सर्वजण मागील एक वर्षापासून COVID च्या साथीचा सामना करत आहोत. इतिहासाला नोंद घ्यावी लागेल इतके मोठे काम महाराष्ट्रातील यंत्रणांनी केले आहे असे ते म्हणाले.

Published by: Meenal Gangurde
First published: February 21, 2021, 8:31 AM IST

ताज्या बातम्या