'मातोश्री'वर पाय ठेवताच खैरेंनी 'गद्दार' म्हटलेल्या सत्तारांबरोबर केलं मनोमीलन

'मातोश्री'वर पाय ठेवताच खैरेंनी 'गद्दार' म्हटलेल्या सत्तारांबरोबर केलं मनोमीलन

"सत्तार हे गद्दार आहेत. 'मातोश्री'वर पाय ठेवू देऊ नका", अशा शब्दांत चंद्रकांत खैरे यांनी आपला संताप व्यक्त केला होता. आता मात्र मातोश्रीवर झालेल्या मनोमीलनानंतर दोन्ही नेते एकमेकांच्या हातात हात घेऊन बाहेर आलेले दिसले.

  • Share this:

मुंबई, 6 जानेवारी : दोनच दिवसांपूर्वी राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे गद्दार आहेत, असं जाहीर वक्तव्य करणाऱ्या चंद्रकांत खैरेंनी 'मातोश्री'च्या आदेशानुसार मनोमीलन झाल्याचं सांगितलं. खैरे आणि सत्तार एकमेकांच्या हातात हात घालून मातोश्रीतून बाहेर पडताना दिसले. आमच्यात आता वाद राहिलेले नाही, असं सत्तार आणि खैरे दोघांनीही स्पष्ट केलं.

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी सेनेचे हे दोन्ही शिलेदार मातोश्रीवर दाखल झाले होते. त्यांच्यातील वाद ठाकरेंनी मिटवल्याचं वृत्त आहे. उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले, "मातोश्रीवरून येणाऱ्या आदेशाचं तंतोतंत पालन केलं जाईल. साहेबांचा आदेश आमच्यासाठी शिरसावंद्य असतो. पक्षशिस्तीप्रमाणेच काम सुरू राहणार. उद्धव ठाकरे यांच्यामुळे दोघांमधले समज- गैरसमज दूर झाले. सर्व मिळून काम करू." खैरे हे शिवसेनेचे नेते आणि मी सेनेचा मंत्री, आमचा रिमोट कंट्रोल मातोश्रीवर आहे, असंही सत्तार म्हणाले.

खैरे यांनीसुद्धा आमच्यात कुठलेही वाद नसल्याचं स्पष्ट केले. अवघ्या दोनच दिवसांपूर्वी खातेवाटप जाहीर व्हायच्या आधी सेनेचे एकमेव मुस्लीम मंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिल्याचं वृत्त पसरलं होतं. एवढंच नाहीतर सत्तार यांच्यामुळे औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सेनेला फटका बसला, असं वक्तव्य चंद्रकांत खैरेंनी केलं होतं.

वाचा - काँग्रेसला सोडून शिवसेनेनं हाती घेतलं कमळ, या जिल्ह्यात दिला भाजपला पाठिंबा

"सत्तार हे गद्दार आहेत. 'मातोश्री'वर पाय ठेवू देऊ नका", अशा शब्दांत चंद्रकांत खैरे यांनी आपला संताप व्यक्त केला होता. आता मात्र मातोश्रीवर झालेल्या मनोमीलनानंतर दोन्ही नेते एकमेकांच्या हातात हात घेऊन बाहेर आलेले दिसले.

अब्दुल सत्तार यांचा राजीनामा ही अफवाच निघाली आणि त्यांनीही उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर मतभेद नसल्याचं आणि नाराज नसल्याचं सांगितलं.

औरंगाबादचं नाट्य

गेल्या आठवड्यात झालेल्या औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या होत्या. अब्दुल सत्तार यांची समजूत काढल्यानंतर शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार देवयानी डोनगावकर यांनी उमेदवारी मागे घेतल्याचं बोललं जात होतं. मात्र, अब्दुल सत्तार यांचा निरोप शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारापर्यंत पोहोचलाच नाही.

औरंगाबाद जिल्हा परिषदअध्यक्षपदी महाविकास आघाडीतर्फे मैदानात उतरलेल्या काँग्रेसच्या उमेदवार मीनाताई शेळके यांचा विजय झाला तर उपाध्यक्षपदी भाजप चे एल.जी.गायकवाड विजयी झाले आहेत. या निवडणुकीत माजी अध्यक्षा देवयानी डोनगवकर आणि शेळके यांना समसमान 30-30 मते पडली होती. त्यानंतर चिठ्ठ्या पाडून एक नाव निवडलं आणि अखेर शेळके यांचा विजय जाहीर झाला.

-------------------------------------------

अन्य बातम्या

असा आहे 'मनसे'चा नवा झेंडा, 23 जानेवारीला राज ठाकरे करणार मोठी घोषणा

फडणवीस सरकारला जमलं नाही ते ठाकरे करून दाखवणार, मराठी भाषेवर मोठा निर्णय

भाजपला बसणार का आणखी एक दणका? असा आहे केजरीवालांच्या दिल्लीचा कौल'

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: January 6, 2020, 8:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading