दोघांचा बुडून मृत्यू , तिघांना वाचवले पण.. सख्या भावला वाचवू शकला नाही गजानन

दोघांचा बुडून मृत्यू , तिघांना वाचवले पण.. सख्या भावला वाचवू शकला नाही गजानन

शेतातून घरी परतणाऱ्या गजानन दत्तारामजी मुंगल यांनी आपल्या जीवाची बाजी लावून पाण्यात उडी मारली.

  • Share this:

मुजीब शेख,(प्रतिनिधी)

नांदेड,10 ऑक्टोबर: अर्धापूर तालुक्यातील बामणी गावातील दोन मुलांचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाला आहे तर तिघांना वाचवण्यात यश आले आहे. गजानन कदम (16) आणि दीपक मंगल (15) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेनंतर बामणी गावावर शोककळा पसरली आहे.

मिळालेली माहिती अशी की, बामणी गावाजळून मेंढला नाला जातो. या नाल्यावर बंधारा बांधण्यात आला असून सध्या हा बंधारा तुडुंब भरला आहे. या बंधाऱ्यात गावातील गजानन सोनाजी कदम, दीपक मुंगल, विशाल उत्तम कदम, ओमकार संतोष कदम, जगदीश दुलबा कदम हे पाच मुले बुधवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास पोहण्यासठी गेले होते. या पाच बालकांना बंधाऱ्यात किती पाणी आहे, याचा अंदाज आला नाही. पोहण्यासठी पाण्यात उतरले असता बुडू लागले. मदतीसाठी हाक मारीत असतांना गावतीलच गजानन दत्तारामजी मुंगल हे आपल्या शेतातून घरी परत येत असताना मुलांची आरडा-ओरड ऐकू आली व ते बंधाऱ्याकडे धावत गेले. त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी मारले. पाच जणांना वाचवण्याचा प्रयत्न केला. यात त्यांनी विशाल उत्तम कदम,ओमकार संतोष कदम, जगदीश दुलबा कदम यांना पाण्याच्या बाहेर काढले. तर गजानन, दीपक या दोघांचा पाण्यात बूडून मृत्यू झाला.सख्या भावला वाचवू शकला नाही गजानन...

दरम्यान, शेतातून घरी परतणाऱ्या गजानन दत्तारामजी मुंगल यांनी आपल्या जीवाची बाजी लावून पाण्यात उडी मारली. यात त्यांनी तिघांचा प्राण वाचविला. पण ते आपल्या सख्या भावला वाचवू शकले नाही. त्यांचा भाऊ दीपक दत्तरामजी मुंगल यांचा मृत्यू झाला. गजानन मुंगल यांच्या धाडसाने तीन प्राण वाचले आहेत. तो तिघांसाठी देवदूत ठरला.

परळीत मला भीती वाटते, पंकजा मुंडेंचं मोठं विधान, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 10, 2019 07:03 PM IST

ताज्या बातम्या