मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /शिवजयंती ठरली शेवटची, कार्यक्रमावरुन परतताना अपघात, उसाच्या असुरक्षित वाहतुकीनं घेतले 2 बळी

शिवजयंती ठरली शेवटची, कार्यक्रमावरुन परतताना अपघात, उसाच्या असुरक्षित वाहतुकीनं घेतले 2 बळी

शिवजयंती कार्यक्रमावरून गावाकडे परतताना ऊसाने भरलेला उभ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला मोटार सायकल धडकली. या अपघातात (Accident) दोन तरुण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

बीड 22 फेब्रुवारी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या (Shiv Jayanti) कार्यक्रमावरून गावाकडे परतताना ऊसाने भरलेला उभ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला एक दुचाकी धडकली. या अपघातात (Accident) दोन तरुण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना बीड (Beed) जिल्ह्यातील माजलगाव - गेवराई रोडवर केसापूरी कैंम्पजवळ घडली. यात 20 वर्षीय रविराज रामहरी शेंडे आणि विवेक भागवत मायकर वय 21 वर्ष या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, तिसरा ओंकार काळे हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला औरंगाबाद येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

माजलगाव शहरात रात्री शिवजयंतीनिमित्त मिरवणूक व सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. हा कार्यक्रम संपल्यानंतर पिंपळगाव नाखले आणि उमरी गावाकडे परतत असताना माजलगाव शहराजवळ केसापुरी कॅम्प परिसरात हा अपघात झाला. उभ्या असलेल्या उसाच्या ट्रॅक्टरला पाठीमागून धडक बसल्याने दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. असुरक्षित उसाची वाहतूक, ट्रॉलीला रिप्लेक्टर नसणे, अर्ध्या रस्त्यात ऊसाची ट्रॉली उभा करणे, यामुळे अपघाताची मालिका माजलगाव परिसरात सतत सुरुच आहे. त्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दोन तरुण ठार झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. उसाच्या असुरक्षित वाहतुकीनं या तरुणांच्या आयुष्यातली ही शेवटची शिवजयंती ठरली आहे.

First published:

Tags: Accident, Road accident