एकाला वाचवायला गेले आणि नदीच्या प्रवाहात दोन जण बुडाले

मुलगा वाहून जात असल्याचं दिसताच नदीच्या काठावर असलेल्या दोघांनी त्याला वाचविण्यासाठी नदीपात्रात उडी घेतली. या पात्रात मोठे खड्डे आहेत. त्या खड्ड्यात नबी आणि कचरू बुडाले असण्याची भीती व्यक्त करण्यात येतेय.

News18 Lokmat | Updated On: Sep 26, 2019 09:33 PM IST

एकाला वाचवायला गेले आणि नदीच्या प्रवाहात दोन जण बुडाले

विजय कमळे पाटील, जालना 26 सप्टेंबर : भोकरदन तालुक्यातील तडेगाव शिवारात पुर्णा नदीच्या पात्रात बुडत असलेल्या एका मुलाला वाचविण्यासाठी पाण्यात उडी मारलेले दोन जण बेपत्ता झालेत. पात्रात मोठा खड्डा असून हे दोघे इसम त्यात बुडाले असतील किंवा वाहून गेले असतील अशी भीती गावकऱ्यांनी व्यक्त केलीय. कचरु विठ्ठल गोफने वय 40, व नसीर नबी सय्यद वय 32 असे या बेपत्ता इसमांची नावं आहेत. घटनास्थळी महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी व पोलीस दाखल झाले असून शोधकार्य सुरू आहे अशी माहिती पोलिसांनी दिलीय. पुर्णा नदीच्या पात्रात एक मुलगा काही कामासाठी आला होता. तो पोहायला नदी पात्रात उतरला. मात्र तो प्रवाहात वाहून जात होता.

एकाच दिवशी भाजपचा डबल अटॅक : आंबेडकर आणि राजू शेट्टींना मोठा धक्का

मुलगा वाहून जात असल्याचं दिसताच नदीच्या काठावर असलेल्या दोघांनी त्याला वाचविण्यासाठी नदीपात्रात उडी घेतली. या पात्रात मोठे खड्डे आहेत. त्या खड्ड्यात नबी आणि कचरू बुडाले असण्याची भीती व्यक्त करण्यात येतेय. या दोघांनाही शोधण्यासाठी बचाव मोहिम राबविण्यात येत आहे. मात्र रात्री उशीरापर्यंत या दोघांचा शोध काही लागला नाही. नदीच्या प्रवाहत ते वाहून गेले असतील तर नदी प्रवाहाच्या पुढच्या दिशेलाही त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

शिवसेना-भाजप युतीवर शिक्कामोर्तब..असा असेल नवा फॉर्म्युला, 'हे' पद सेनेकडे?

नदीच्या पात्रात अनेकदा वाळू उपश्यांमुळे मोठे खड्डे निर्माण झालेले असतात. नदी पात्रात जाताना पाण्याचा आणि त्याच्या खोलीचा अंदाज घेऊनच उतरा असा इशारा प्रशासनाने दिलेला असतो. मात्र असं असतानाही अनेकदा  तो इशारा धुडकावून लोक नदीपात्रात किंवा प्रवाहात उतरतात त्यामुळे अनेकदा दुर्घटना होते आणि हकनाक जीव जातो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 26, 2019 09:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...