देवीच्या यात्रेला पायी जाणाऱ्या सहा मित्रांना भरधाव बसने चिरडले, दोघे जागेवरच ठार

देवीच्या यात्रेला पायी जाणाऱ्या सहा मित्रांना भरधाव बसने चिरडले, दोघे जागेवरच ठार

सुदर्शन आणि अनिकेत हे दोघे आपल्या इतर मित्रांसोबत पहाटे साडेचार वाजता कर्णपुरा देवीच्या दर्शनासाठी पायी जात होते.

  • Share this:

सचिन जिरे,(प्रतिनिधी)

औरंगाबाद,6 ऑक्टोबर: शहरातील कर्णपुरा देवीच्या यात्रेला पायी जाणाऱ्या सहा मित्रांना भरधाव बसने चिरडले. यात दोघांचा जागेवरच मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यातील तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. नवरात्रोत्सवात औरंगाबाद शहरातील लाखो भाविक दररोज पहाटे कर्णपुरा येथे देवीच्या दर्शनाला पायी जातात.

औरंगाबाद-जालना मार्गावर सेव्हनहील परिसरात रविवारी पहाटे ही घटना घडली. सुदर्शन साळुंखे व अनिकेत काळवणे अशी मृतांची नावे आहेत. तर संदीप बनसोडे, आदित्य गायकवाड, शुभम नरवाडे अशी जखमींची नावे आहेत. जखमींना तातडीने घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.

सुदर्शन आणि अनिकेत हे दोघे आपल्या इतर मित्रांसोबत पहाटे साडेचार वाजता कर्णपुरा देवीच्या दर्शनासाठी पायी जात होते. सेव्हनहील परिसरात एका भरधाव मिनिबसने सगळ्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली.अपघतानंतर बसचा चालक पसार झाला होता. त्यांचा पाठलाग करून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. याप्रकरणी पुंडलीकनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरिक्षक धनंजय मुळे करत आहेत.

वीज पडून 3 ठार,2 जण जखमी...

जालन्यातील भागडे सावरगाव येथे वीज पडून 3 ठार,2 जण जखमी झाल्याची घटना रविवारी दुपार घडली. सोयाबीन सोंगणीचे काम करत असताना वीज कोसळली. मृतांमध्ये 2 महिलांसह पुरुषाचा समावेश आहे. जालना तालुक्यात काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. तालुक्यातील भागडे सावरगाव शिवारात वीज कोसळून 3 जण ठार झाले तर 2 जण गंभीर जखमी झालेत. ठार झालेल्यांमध्ये 2 महिलांसह एका पुरुषाचा समावेश आहे. गयाबाई नाईकनवरे, संदीप पवार यांच्यासह आणखी एक महिला या घटनेत मृत्युमुखी पडली आहे. सध्या सोयाबीन सोंगणीचा हंगाम आहे.सोयाबीन सोंगणीच्या कामासाठी शेती गेलेले असताना ही घटना घडली.या घटनेमुळे परीसरात हळहळ व्यक्त होत असून जखमी झालेल्यांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

VIDEO:माकडाने पाडला पैशांचा पाऊस, पैसे घेण्यासाठी लोकांची गर्दी

First published: October 6, 2019, 3:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading