शेत तळ्यात बुडून दोन भावांचा मृत्यू, कुटुंबात केवळ महिला उरल्या

शेत तळ्यात बुडून दोन भावांचा मृत्यू, कुटुंबात केवळ महिला उरल्या

गेवराई तालुक्यातील सिरसमार्ग येथे शेत तळ्यात बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

  • Share this:

सुरेश जाधव,(प्रतिनिधी)

बीड,30 ऑक्टोबर: गेवराई तालुक्यातील सिरसमार्ग येथे शेत तळ्यात बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोन वर्षांपूर्वीच वडिलांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे आता या कुटुंबात केवळ दोन महिलाच राहिल्या आहेत. ऐण दिवाळीत घडलेल्या दुखद घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.

सिरसमार्ग येथे ठोंबरे कुटुंबातील विकास (वय-24 ) आणि गणेश (वय-22 ) हे दोघे शेतात पाहणी करण्यासाठी गेले होते. ते शेत तळ्याशेजारी असताना विकासाचा पाय घसरल्याने तो शेत तळ्यात पडला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात गणेश देखील शेत तळ्यात पडला. दोघांचाही शेत तळ्यात बुडून मृत्यू झाला. 

मयत विकास आणि गणेश हे दोघे सख्खे भाऊ होते. त्यांचे वडील सुदाम ठोंबरे यांचा दोन वर्षांपूर्वीच मृत्यू झाला होता. यातील विकासाचा काही दिवसांपूर्वी विवाह झाला होता. आता ठोंबरे कुटुंबात मयत विकासची पत्नी आणि आई या दोघीच उरल्या आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सेल्फी काढताना धबधब्यात पडून पर्यटकाचा मृत्यू

सेल्फीचा नाद नागपूर जिल्ह्यातील कामठी येथून चिखलदरा येथे पर्यटनासाठी आलेल्या एका पर्यटकाच्या जीवावर बेतला आहे. सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात पाय घसरल्याने थेट 300 फूट खोल कोसळणाऱ्या धबधब्यात पडल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (29 ऑक्टोबर) दुपारी साडेबाराच्या सुमारास चिखलदरा येथील पंचबोल पॉईंट लगत असलेल्या जत्रताडोह धबधब्याजवळ घडली. अनिल रंगराव राऊत (वय-28, रा. कामठी) असे मृत तरुणाचे नाव आहे.

अनिल राऊत हा कोराडी येथील एका कंस्ट्रक्शन कंपनीत नोकरीला होता. दिवाळीच्या सुट्या असल्यामुळे तो अभिषेक सुरेशराव ठाकरे, अभिलाष चिंतामण मेंदाराशे, अशोक ठाकरे, गुणवंत राऊत व अन्य दोन अशा सहा सहकाऱ्यांसह सोमवारी (28 ऑक्टोबर) रात्री स्कॉर्पिओ गाडीने (एमएच 40/ एआर 8988) चिखलदरा येथे मुक्कामी आले होते. मंगळवारी पंचबोल पॉईंटलगत असलेल्या जत्रा डोह धबधब्याजवळ सेल्फी काढत असता, अचानक त्याचा तोल गेल्याने तो 300 फूट खोल धबधब्यात कोसळला. घटनेबाबत अभिलाष मेंदाराशे यांनी चिखलदरा पोलिसांत तक्रार दाखल केली.

गोताखोरांच्या मदतीने सायंकाळी त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. चिखलदरा येथील ग्रामीण रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून याबाबत मृताच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली आहे.

CCTV VIDEO: जेवण चांगल न दिल्याच्या रागातून वेटरला बेदम मारहाण

Published by: Sandip Parolekar
First published: October 30, 2019, 5:14 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading