बहिणीच्या अंत्यविधीला जाताना रक्षाबंधनाच्या दिवशी दोन भावांचा मृत्यू

बहिणीच्या अंत्यविधीला जाताना रक्षाबंधनाच्या दिवशी  दोन भावांचा मृत्यू

संजय आणि नारायण गव्हाणे हे दोघेही आपल्या दुचाकीवरून मुदखेड येथील चुलत बहिणीच्या अंत्यविधीला जात होते. लिंबगाव पाटीजवळ येतात त्यांच्या दुचाकीला एका कारने धडक दिली त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

  • Share this:

शेख मुजीब, नांदेड 15 ऑगस्ट: चुलत बहिणीच्या अंत्यविधीला जाणाऱ्या दोन सख्ख्या भावावर काळाने घाला घातलाय. लिंबगावजवळ झालेल्या दुचाकी अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना 15 ऑगस्टच्या सकाळी नऊच्या सुमारास घडली. आज रक्षाबंधन असल्यानेही परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.  परभणी जिल्हयातील कमळापूर येथील संजय आणि नारायण गव्हाणे हे दोघे भाऊ दुचाकीवरून नांदेड मधील मुदखेड येथे चुलत बहिणीच्या अंत्यविधीला जात होते नांदेड मधील लिंबगाव जवळ त्यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या कार ने धडक दिली.

कमाल! पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एका Facebook ग्रूपने जमा केला 9 लाखांचा निधी

संजय आणि नारायण हे दोघही पूर्णा तालुक्यातील कमळापुर येथील रहिवासी आहेत. संजय गव्हाणे आणि नारायण गव्हाणे हे दोघेही आपल्या दुचाकीवरून मुदखेड येथील चुलत बहिणीच्या अंत्यविधीला जाण्यासाठी सकाळी निघाले होते. लिंबगाव पाटीजवळ येतात त्यांच्या दुचाकीला एका कारने धडक दिली. या धडकेत ते दोघेही जागीच ठार झाले. घटनास्थळावरून पोलिसांनी दोन्ही वाहने जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. या दुर्दैवी घटनांमुळे कमळापूर गावावर शोककळा पसरली आहे.

रक्षाबंधनाच्या दिवशी महिला पोलिसाचीच छेडछाड, कपडे फाटेपर्यंत रोडिरोमिओला धुतला

गुरूवार ठरला भावडांसाठी काळवार

औरंगाबद : रक्षाबंधन आणि 15 ऑगस्ट एकाच दिवशी आल्यानं गुरुवारी राज्यात आनंदाचं वातावरण होतं. मात्र औरंगाबादमधल्या बहिण भावंडांसाठी आजचा दिवस काळवार ठरला. शाळेत जाण्यासाठी बसची वाट पाहात उभ्या असलेल्या छोट्या बहिण भावंडांना मोठा फटका बसला. एक भरधाव कारणे या चिमुकल्यांना उडवलं त्यात भावाचा मृत्यू झाला तर बहिण गंभीर जखमी आहे.

नर्सने पेशंटलाच बांधल्या राख्या, ठाणे हॉस्पिटलमध्ये रंगला अनोखा रक्षाबंधन सोहळा

संभाजी ज्ञानेश्वर शिंदे (वय 6) हा पहिलीत होता. तर त्याची बहिण श्रावणी (वय 9) ही तिसरीत होती. संभाजी आणि श्रावणी हे शाळेत जाण्यासाठी बसची वाट बघत होते. स्वातंत्र दिवस असल्याने संभाजीने नेताजी सुभाषचंद्र बोस यांची वेशभुषा केली होती. मात्र नियतीला ते मंजूर नव्हतं. ही भावंड बस स्टॉपवर असतानाच एका भरधाव कारने या दोघांनाही धडक दिली.

या धडकेत संभाजीचा जागीच मृत्यू झाला तर श्रावणी तब्बल 20 फुट फरफटत गेली. तिची प्रकृती गंभीर असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघाताने शिंदे कुटुंबीयांवर मोठं संकट कोसळलं. कारचालक हा अल्पवयीन होता अशी माहिती पोलिसांनी दिलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 15, 2019 08:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading