मामाच्या गावाला आलेल्या भावंडांचा तलावात बुडून मृत्यू

मामाच्या गावाला आलेल्या भावंडांचा तलावात बुडून मृत्यू

अचानक एक बैल पळाल्याने त्याला पकडण्यासाठी मामाच्यामागे दोघे भावंडे धावले...

  • Share this:

सुरेश जाधव,(प्रतिनिधी)

बीड,10 नोव्हेंबर: बैल धुण्यासाठी गेलेल्या दोन भावंडांचा लिंबोडी तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घटली आहे. संकेत बापू आघाव (वय-7) व महेश सतीश आंधळे (वय-9) अशी मृत मुलांची नावे असून ते आते-मामे भाऊ होते.

आष्टी तालुक्यातील खिळद येथील संकेत बापु आघाव हा आईसोबत भाऊबीजनिमित्त मामाच्या गावी लिंबोडी येथे आला होता. शनिवारी सायंकाळी संकेत त्याच्या मामाचा मुलगा महेशसोबत शेतात गेला होता. अचानक एक बैल पळाल्याने त्यास पकडण्यासाठी कैलास आंधळे हे धावले. संकेत व महेश हे ही त्यांच्या मागे तलावाच्या दिशेने धावले. तलावात पाण्याचा अंदाज न आल्याने या दोघांचा बुडून मृत्यू झाला. आष्टी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू...

दुसरी घटना गेवराई तालुक्यातील राजपिंप्री येथे घडली आहे. प्रवीण शंकर पवार (वय-19) हा युवक शनिवारी दुपारी पोहण्यासाठी गावाशेजारील विहिरीत गेला होता. विहिरीत खूप पाणी होते. त्यामुळे बुडून त्याचा मृत्यू झाला. उशिरापर्यंत मृतदेह शोधण्याचे काम सुरू होते. गेवराई पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.

पोहायला शिकवणाऱ्या वडिलांसह मुलाचाही मृत्यू

एकाच वेळी वडील आणि मुलाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक घटना करमाळा तालुक्यातील मलवडी येथील दुर्गुळे कोंढलकर वस्ती येथील विहिरीवर मुलाचा आणि वडिलांचा एकाच वेळी मृत्यू झाला आहे. मुलाला पोहायला शिकवताना वडिलांचा आणि पोहायला शिकणाऱ्या मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

शिवाजी भीमराव कोंढलकर (वय-35) असं वडिलांचं तर सोनू शिवाजी कोंढलकर (वय-11)असं मुलाचं नाव आहे. इयत्ता सहावी मध्ये अजितदादा पवार विद्यालय वडशिवणे इथे सोनू शिकत होता. हे दोघेही पोहण्यासाठी विहिरीत उतरले होते. वडिल शिवाजी हे सोनूला पोहायला शिकवण्यासाठी घेऊन गेले होते. पण सतत सुरू असलेल्या पावासामुळे विहिरीत पाण्याचं प्रमाण जास्त होतं. अशात पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बाप-लेकाचाही मृत्यू झाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

विहिरीत जास्त पाणी असल्याने अद्याप दोघांचाही मृतदेह सापडले नसून मोटारीच्या साहाय्याने विहिरीतलं पाणी काढण्याचं काम सुरू आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर ग्रामस्थ आणि पोलीस प्रशासनाकडून मृतदेह शोधण्याचं काम सुरू आहे. अशा प्रकारे वडिल आणि मुलानेही प्राण गमावल्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. तर कोंढलकर कुटुंबीयांवरही दुखाचा डोंगर कोसळला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 10, 2019 12:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading