Home /News /maharashtra /

भरधाव अल्टो कंटेनरवर आदळली, तीन जणांचा जागेवरच मृत्यू, कारचाही चुराडा

भरधाव अल्टो कंटेनरवर आदळली, तीन जणांचा जागेवरच मृत्यू, कारचाही चुराडा

पैठण-औरंगाबाद मार्गावरील इसारवाडी फाट्याजवळ पहाटे पाच वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.

औरंगाबाद, 9 जानेवारी: कंटेनर आणि अल्टो कारचा समोरा-समोर भीषण अपघात होऊन तीन जणांचा जागेवरच मृत्यू झाला. पैठण-औरंगाबाद मार्गावरील इसारवाडी फाट्याजवळ पहाटे पाच वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. बाळासाहेब डाके, त्यांची पत्नी अंबिका डाके, सुमन नरवडे अशी मृतांची नावे आहेत. सर्व मृत हे अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथील रहिवासी आहेत. अपघात इतका भीषण आहे की, अल्टो कारचा अक्षरश: चुराडा झाला आहे. पैठण येथील ग्रामीण रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी आणले आहेत. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Aurangabad news, Marathwada

पुढील बातम्या