कोरोना झाल्याचा आरोप करत मराठवाड्यात एकाच कुटुंबातल्या तिघांना काठीने बेदम मारहाण

कोरोना झाल्याचा आरोप करत मराठवाड्यात एकाच कुटुंबातल्या तिघांना काठीने बेदम मारहाण

  • Share this:

औरंगाबाद 26 मार्च : कोरोनाची दहशत आता गावपातळीवरही गेली आहे. कोरोना झाल्याचं सांगत मराठवाड्यात एकाच कुटुंबातल्या तिघांना काठीने बेदम मारहाण केल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. पाचोड सोनवाडी खुर्द येथील एक तरुण सोनवाडी बु येथील एका दुकानात किराणा सामान आणण्यासाठी गेला होता. दुकानांच्या बाहेर उभा असलेल्या एका सांगितले की तुम्हाला कोरोना झाला आहे असं म्हणून एकाच कुटुंबातील तीन जणांना लाठी काठी आणि लोखंडी गजाने बेदम मारहाण केली. यात तीन जण गंभीर जखमी आहे.

सध्या देशभर व संपूर्ण जगात कोरोना विषाणू ने थैमान घातले आहे कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकार अहोरात्र प्रयत्न करत आहे मुंबई व पुणे येथे बरेच रुग्ण कोरोना चे आढळून आल्यामुळे मुंबई पुणे येथे नौकरी करत असलेले व शिक्षण घेत असलेले आता गावाकडे परतू लागले आहे सोनवाडी तालुका पैठण येथील तरुण एका कंपनीत नोकरी करत आहेत तो दहा मार्च रोजी गावाकडे आला होता.

तो तरुण दुकानात किराणा माल घेण्यासाठी गेला होता याचवेळी दुकानांच्या बाहेर त्याला काहींनी  विचारले की तुला कोरोना झाला आहे आमच्या गावात का आलास असं म्हणून त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्याने आपल्या भावाला व वडिलांना फोन करून सांगितले आहे की मला दुकानासमोर मारहाण करत आहेत. त्यानंतर त्याचे आई वडील भाऊ व बहीण हे किराणा दुकानाजवळ आले होते यांना पण तीन ते चार जणांनी बेदम मारहाण केली आहे  ते जखमी झाले आहे. यावेळी जखमीला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

 

First published: March 26, 2020, 10:18 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading