क्षुल्लक कारणावरून झाली बाचाबाची... औरंगाबादमध्ये एका कुटुंबातील तिघांचा खून

क्षुल्लक कारणावरून झाली बाचाबाची... औरंगाबादमध्ये एका कुटुंबातील तिघांचा खून

एकाच कुटुंबातील तिघांवर एकाने धारदार शस्त्राने वार करुन निर्घृण खून करण्यात आला आहे. यात मुलासह आई-वडिलांचा मृत्यू झाला आहे.

  • Share this:

सिद्धार्थ गोदाम,(प्रतिनिधी)

औरंगाबाद, 25 सप्टेंबर: एकाच कुटुंबातील तिघांवर एकाने धारदार शस्त्राने वार करुन निर्घृण खून करण्यात आला आहे. यात मुलासह आई-वडिलांचा मृत्यू झाला आहे. चिकलठाणा परिसरातील चौधरी कॉलनीत घटना ही घटना घडली आहे. मारेकरी अमोल बोर्डे याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चिकलठाणा भागातील चौधरी कॉलनीत एकाच कुटुंबातील तिघांचा धारदार शस्त्राने वार करुन खून झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास घडली आहे. दिनकर भिकाजी बोराडे (वय-55), कमल दिनकर बोराडे(वय-50) आणि भगवान दिनकर बोराडे (वय-25)अशी मृतांची नावे आहेत.दिनकर भिकाजी बोराडे आपली पत्नी कमल दिनकर बोराडे आणि मुलगा भगवान दिनकर बोराडे यांच्यासोबत राहत होते. आज संध्याकाळी ते तिघे घरात असताना त्यांच्याच परिसरात राहणारा आरोपी अमोल बोर्डे त्यांच्या घरात घुसला आणि कोणालाही काही समजण्या आधी त्याने त्या तिघांवर धारदार शस्त्राने सपासप वार केले.अचानक झालेल्या या हल्यामुळे बोराडे कुटुंबीयांना स्वतःचा बचाव करता आला नाही. यात हल्यात त्या तिघांचा जागीच मृत्यू झाला. घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

क्षुल्लक कारणावरून झाली बाचाबाची

भगवान बोराडे आणि अमोल बोर्डे यांच्यात फोनवरून क्षुल्लक वाद सुरू होता. त्यातून अमोल याने ही तिहेरी हत्या केल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त डॉ.राहुल खाडे, वरिष्ठ निरीक्षक सुरेंद्र माळाळे, गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत, उपनिरीक्षक अमोल देशमुख, सुरेश जारवाल यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपी अमोल बोर्डेला घटनास्थळी अटक केली आहे.

दुचाकी देत नाही म्हणून नशेखोरांनी केली तरुणाची हत्या

दरम्यान, औरंगाबाद शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शहरात दोन दिवसांत चार खूनाच्या घटना घडल्या आहेत. दुचाकी देत नाही म्हणून काही नशेखोरांनी एका 24 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादेतील पाडेगाव कासम्बरीनगर भागात घडली आहे. दरम्यान, औरंगाबाद शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. एका आठवड्यात तरुणाची हत्या झाल्याची तिसरी घटना समोर आली आहे.

सय्यद जमीर सय्यद जहीर असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. परिसराकतीलच काही ओळखीचे टवाळखोर नेहमी दुचाकी मागत असल्याने वैतागलेल्या जमीर ने त्यांना काही दिवसांपासून दुचाकी देणे बंद केले होते. या रागातून काही दिवसांपूर्वी त्याची दुचाकी फोडण्यात आली होती. मात्र, मंगळवारी रात्री काही नशेखोरांनी जमीरला कासम्बरी नगर भागात बोलावून बेदम मारहाण केली. नंतर धारदार शस्त्राने त्यावर वार करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले असून पोलीस हत्येचा तपास करत आहेत.

दरम्यान, गेल्या आठवड्यात हॉटेलमध्ये काम करणाऱ्या तरुणाचा खून करून त्याचा मृतदेह गोगाबाबा टेकडीच्या पायथ्याशी फेकण्यात आला होता. शफिक खान रफिक खान (वय-28) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून तो शहरातील एका हॉटेलमध्ये नोकरी करत होता. शफिक खान रफिक खान याचा गळा आवळून खून करण्यात आला होता.

5 वर्ष कुठे होता? प्रचारासाठी आलेल्या काँग्रेस आमदाराला आजीबाई सुनावले खडेबोल, VIDEO व्हायरल

First published: September 25, 2019, 10:16 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading