Home /News /maharashtra /

हा तर कहरच! चोरट्यांनी कोरोना रुग्णाचंही लुटलं घर, चोरलेली रक्कम वाचून बसेल धक्का

हा तर कहरच! चोरट्यांनी कोरोना रुग्णाचंही लुटलं घर, चोरलेली रक्कम वाचून बसेल धक्का

आता कोरोना बाधितांची घरं चोरट्यांकडून टारगेट केली जात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

बीड, 23 ऑगस्ट : राज्यात कोरोनामुळे मोठं संकट ओढावलं आहे. अशात लॉकडाऊनमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. पण या सगळ्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरोना बाधिताचे घर फोडून सव्वा लाखांचा ऐवज लंपास करण्यात आली आहे. त्यामुळे आता कोरोना बाधितांची घरं चोरट्यांकडून टारगेट केली जात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाची लागण झाल्यानंतर पतीचा मृत्यू झाला तर उपचारानंतर पत्नी अंबाजोगाईतील नातेवाईकांकडे विलगीकरणात आहे. त्यामुळे घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घरातील दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 1 लाख 30 हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना परळी शहरातील जुन्या रेल्वेस्टेशन जवळ उघडकीस आली आहे. पुतणीला आधी बेशुद्ध करून फेकलं विहिरीत, यानंतर घडलेल्या प्रकाराने शहरं हादरलं या प्रकरणी संभाजी नगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस संपूर्ण घटनेचा तपास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग झाला की रुग्णालय किंवा क्वारंटाईन सेंटरमध्ये जावं लागतं. काही वेळा तर संपूर्ण कुटुंबच क्वारंटाईन सेंटरमध्ये असतं. चोरट्यांनी या संधीचा फायदा घेत संधी साधली आहे. मुस्लीम मामा, हिंदू भाची! या फोटोनं जिंकलं महाराष्ट्राचं मन या घटनेमुळे संपूर्ण परिसरातील नागरिक अलर्ट झाले असून काळजी घेण्याच्या सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत.
Published by:Renuka Dhaybar
First published:

पुढील बातम्या