आत्महत्या प्रतिबंधदिनीच आत्महत्या.. पुस्तकांच्या गराड्यात विद्यार्थ्याने घेतला गळफास

आत्महत्या प्रतिबंधदिनीच आत्महत्या.. पुस्तकांच्या गराड्यात विद्यार्थ्याने घेतला गळफास

औरंगाबाद शहरात एकाने जागतिक आत्महत्या प्रतिबंधदिनीच आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • Share this:

औरंगाबाद, 11 सप्टेंबर: शहरात एकाने जागतिक आत्महत्या प्रतिबंधदिनीच आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे यात दहावीचे शिक्षण घेणाऱ्या 16 वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. प्रेम शीलानंद दांडगे (रा. आंबेडकरनगर) असे मृत मुलाचे नाव आहे.

पुस्तकांच्या गराड्यात विद्यार्थ्याने घेतला गळफास

प्रेम हा बळीराम पाटील हायस्कूलमध्ये शिकत होता. मंगळवारी मोहरम ताजियाची सुटी असल्याने तो घरीच होता. अभ्यासासाठी तो दप्तर, वह्या, पुस्तके घेऊन गच्चीवर गेला. त्याने वह्या-पुस्तकांच्या गराड्यात गळफास घेतला. दुपारी 1 वाजेच्या सुमारास घरमालक कपडे वाळत घालण्यासाठी गेले असता प्रेमने गळफास घेतल्याचे दिसले.

प्रेमने जेथे आत्महत्या केली तेथे पोलिसांनी पाहणी केली. तेव्हा दप्तरासह पुस्तके, गणिते सोडवलेली वह्या, कागदे तेथेच आजूबाजूला होती. त्यात प्रेमने काही मजकूर लिहिला का, हे पोलिसांनी तपासले. मात्र, तसे काही आढळून आले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रेमचे वडील सुरक्षा रक्षक, आई गृहिणी असून त्याला दोन लहान बहिणी आहेत.

मोकाट कुत्र्याने चेहऱ्यावर चावा घेतला चिमुरडीचा मृत्यू

दरम्यान, औरंगाबाद शहरात आणखी एक ह्रदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. मोकाट कुत्र्याने चेहऱ्यावर चावा घेतल्याने एका चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मुकुंदवाडी परिसरात ही घटना घडली आहे. मुलीचे नाव अक्षर वाव्हळे असून ती 2 वर्षाची होती. अक्षराला मोकाट कुत्र्याने चेहऱ्यावर चावा घेतला होता. जखम खोलवर असल्याने इन्फेक्शनमुळे आठवडा भरातच तिचा मृत्यू झाला. अक्षराचा मृत्यू खरंच कुत्र्याचा चावा घेतल्याने झाला का, याचा उलगडा पोस्टमार्टेम रिपोर्ट आल्यानंतरच होईल.

VIDEO:हर्षवर्धन पाटलांसोबत मुलगी काँग्रेस सोडणार नाही? अंकिता पाटील म्हणतात...

Published by: Sandip Parolekar
First published: September 11, 2019, 2:23 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading