अयोध्या प्रकरणाच्या निकालानंतर फटाके फोडून जल्लोष करणाऱ्यांवर गुन्हा

अयोध्या प्रकरणाच्या निकालानंतर फटाके फोडून जल्लोष करणाऱ्यांवर गुन्हा

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने शनिवारी आपला ऐतिहासिक निकाल दिला

  • Share this:

सचिन जिरे(प्रतिनिधी)

औरंगाबाद,9 नोव्हेंबर: अयोध्येतील रामजन्मभूमीच्या विवादावर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या ऐतिहासिक निकालानंतर फटाके वाजवून जल्लोष करणाऱ्या 6 ते 7 जणांवर औरंगाबादच्या क्रांति चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपोपींवर प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

रामजन्मभूमी आणि बाबरी मशिदीच्या विवादावर सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून शहरात पाच आणि पाचपेक्षा अधिक नागरिक जमण्यास व स्फोटक पदार्थ बाळगण्यास व ते फोडण्यास औरंगाबाद शहर पोलिसांनी निर्बंध घातले होते.

सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर शहरातील नागेश्वरवाडी भागात काही तरुणांनी फटाके फोडून जल्लोष करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनस्थळी घाव घेतली. मात्र, तोपर्यंत जल्लोष करणारे निघून गेले होते. या प्रकरणी क्रांतिचौक पोलीस ठाण्यात अज्ञात 6 ते 7 जणांविरोधात प्रतिबंधात्मक आदेश लागू असताना फटाके फोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक उत्तम मुळूख यांनी दिली आहे.

दरम्यान, संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने शनिवारी आपला ऐतिहासिक निकाल दिला आहे. अयोध्येतील वादग्रस्त जागा रामलल्लाचीच असून काही अटी शर्तीच्या आधारावर ती हिंदुंना मिळणार आहे. मुस्लिमांना मशीद बांधण्यासाठी पर्यायी जागा मिळणार असल्याचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी दिला आहे. रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने आपला निकाल दिला आहे. आतील भाग अद्यापही वादग्रस्त असून ती जागा ट्रस्टच्या ताब्यात देण्यात येईल, यासाठी केंद्र सरकारने आगामी तीन महिन्यात ट्रस्ट स्थापन करावे, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. सुन्नी वक्फ बोर्डाने सुप्रीम कोर्टाच्या निकालाचे स्वागत केले आहे.

दरम्यान, 6 ऑगस्टपासून 16 ऑक्टोबरपर्यंत 40 दिवस हिंदू आणि मुस्लिम पक्षकाराची बाजू ऐकल्यानंतर कोर्टाने हा निर्णय राखून ठेवला होता. दरम्यान, सरन्यायाधीश गोगोई हे 17 नोव्हेंबरला निवृत्त होत असून त्याआधी त्यांनी या प्रकरणाचा निकाल दिला आहे. यानिकालाच्या संपूर्ण मुंबईत जमावबंदीचे (144 कलम) आदेश देण्यात आले आहेत.

VIDEO : काय आहे अयोध्येचा वाद? जाणून घ्या थोडक्यात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 9, 2019 04:18 PM IST

ताज्या बातम्या