हत्या झालेल्या शिक्षकाच्या नातेवाईकाने पोलीस अधिक्षक कार्यालयातच अंगावर ओतले रॉकेल

हत्या झालेल्या शिक्षकाच्या नातेवाईकाने पोलीस अधिक्षक कार्यालयातच अंगावर ओतले रॉकेल

पोलीस आणि इतर नातेवाईकांनी वेळीच त्यांन रोखल्याने मोठा अनर्थ टळला. पोलीस या प्रकरणाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

  • Share this:

बीड,20 सप्टेंबर: शहरातील सैनिकी विद्यालयाचे शिक्षक सय्यद सज्जाद यांची गुरुवारी दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली होती. मारेकऱ्यांवर कारवाईसाठी मृत शिक्षकाचे नातेवाईक मोमिन कौसर यांनी पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या आवारात चक्क अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलीस आणि इतर नातेवाईकांनी वेळीच त्यांन रोखल्याने मोठा अनर्थ टळला. पोलीस या प्रकरणाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

लब्बैक युवा मंचच्या माध्यमातून काम करत असलेले शिक्षक सय्यद साजेद यांची गुरुवारी दुपारी धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. या प्रकरणात गुज्जर खानसह इतर आरोपींवर गुन्हा दाखल झाला होता. गुज्जर खानवर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असून त्याच्यावर एमपीडीएअंतर्गत कारवाई झाली होती. मात्र, त्याला जामीन मिळाला होता. त्यानंतर तो अनेक गुन्हयात फरार आहे. विशेष म्हणजे मयत शिक्षक साजेद यांनी यापूर्वी अनेकदा पोलीसांकडे संरक्षणाची मागणी केली होती. मात्र पोलिसांनी याची दखल घेतली नाही.

आत्मदहनाचा प्रयत्न केलेल्या कौसर अली यांनी या पूर्वी हत्या प्रकरणातील आरोपींविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. कौसर अली यांना एक कोटीची खंडणी मागण्यात आली होती. तसेच त्यांचे घर जाळण्याचाही प्रयत्न झाला होता. मात्र त्या प्रकरणातही आरोपी गुज्जर खानला अटक झाली नव्हती. दरम्यान जोपर्यंत मारेकरी आरोपी अटक होत नाहीत तोपर्यत सय्यद यांचा मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका नातेवाईकांनी घेतल्याने तणावाचे वातावरण आहे.

तीन आरोपी अटकेत...अजून जीवे मारण्याच्या धमक्या सुरुच

मृत शिक्षक सय्यद साजिद अली यांचे नातेवाईक कौसर अली यांनी शुक्रवारी पोलिस अधीक्षक कार्यालयात रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता. या गंभीर घटनेनंतर पोलिसांनी सूत्र हलवून या प्रकरणातील गुज्जर खान गॅंगमधील तीन आरोपींना अटक केली आहे. पापामिया भाई, शेख इम्रान शेख उर्फ काला, शेख उबेद अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. मात्र, अद्याप मुख्य आरोपी गुज्जर खान याला अटक केले नाही.

CCTV VIDEO: मी बिल का देऊ म्हणत तरुणाची हॉटेल मालकाला बेदम मारहाण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 20, 2019 04:21 PM IST

ताज्या बातम्या