मोठी बातमी! मराठा आरक्षणाच्या स्थगितीमुळे तरूणाचा आत्महत्येचा प्रयत्न

मोठी बातमी! मराठा आरक्षणाच्या स्थगितीमुळे तरूणाचा आत्महत्येचा प्रयत्न

राज्य सरकारचा निषेध करत थेट गनिमी काव्यानं आंदोलन करणार असल्याची आक्रमक भूमिका घेतली आहे तर दुसरीकडे एका विद्यार्थ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.

  • Share this:

लातूर, 10 सप्टेंबर : मराठा आरक्षण (maratha reservation) प्रकरणात सुप्रीम कोर्टात (maratha quota in supreme court) सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान कोर्टाने वर्ष 2020-21 साठी मराठा आरक्षण स्थगित करण्याचा निर्णय दिला आहे. याचे पडसाद आता राज्यभर उमटायला सुरूवात झाली आहे. मराठा आरक्षणाचा वाद आता पुन्हा पेटला आहे. आज क्रांती मोर्चा समनव्याकांची नाशकात बैठक पार पडणार आहे. यामध्ये राज्य सरकारचा निषेध करत थेट गनिमी काव्यानं आंदोलन करणार असल्याची आक्रमक भूमिका घेतली आहे तर दुसरीकडे एका विद्यार्थ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.

राज्यातील मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे एका उच्च शिक्षित तरूणाने तहसील कार्यालयाच्या प्रांगणात विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव (ता. चाकूर) इथल्या किशोर कदम (वय 25) या तरूणाने पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. तो सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. सध्या त्या तरुणावर उपचार सुरू आहेत.

PHOTO नीट पाहा! येरवडा जेलमधून पळून गेले हे दोन कैदी, आहेत कोरोना पॉझिटिव्ह

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी आक्रमक आंदोलनाची रणनीती आखण्यासाठी नाशिकमध्ये महत्त्वाची बैठक पार पडत आहे. आता आंदोलन गनिमी काव्यानं करणार अशी ठाम भूमिका जाहीर करत राज्य सरकारचाही निषेध केला आहे. या आंदोलनाची पहिली ठिणगी हा नाशिकमध्ये पेटणार असल्याची चिन्ह आहेत. कायदेशीर लढाईसोबत गनिमी कावाही करू असा या बैठकीत निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

शिवसेनेत खळबळ! आणखी एका आमदाराला कोरोनाची लागण, अधिवेशनालाही होते उपस्थित

पदव्युत्तर आरक्षण प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे यावर निर्णय घेता येणार नाही, पण वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमामध्ये मराठा आरक्षणाचा लाभ देता येणार नाही, असं न्यायालयाने स्पष्ट केलं. मराठा आरक्षणप्रकरणी आता घटनात्मक खंडपीठ सुनावणी पुढची सुनावणी करणार आहे. सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती एल नागेश्वर राव यांच्या खंडपीठाने मोठा निर्णय घेत आरक्षणाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. त्यामुळे आता पुढची सुनावणी होईपर्यंत राज्य सरकारच्या नोकर भरतीमध्ये मराठा समजाला आरक्षणाचा लाभ मिळणार नाही.

Published by: Renuka Dhaybar
First published: September 10, 2020, 2:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading