मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

अधिकाऱ्याने महिलांच्या ग्रुपवर शेअर केला स्वत:चा न्यूड फोटो, आता होणार कसून चौकशी

अधिकाऱ्याने महिलांच्या ग्रुपवर शेअर केला स्वत:चा न्यूड फोटो, आता होणार कसून चौकशी

या प्रकरणात पालकमंत्री आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी यात लक्ष घालावं आशी मागणी माहिला करत आहेत.

या प्रकरणात पालकमंत्री आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी यात लक्ष घालावं आशी मागणी माहिला करत आहेत.

या प्रकरणात पालकमंत्री आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी यात लक्ष घालावं आशी मागणी माहिला करत आहेत.

बीड, 23 जुलै : न्युज 18 लोकमतच्या बातमीनंतर महिला बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी समिती बीडमध्ये दाखल झाली आहे. या प्रकरणी तीन सदस्यांची अधिकाऱ्यांची कसून चौकशी करत दोन दिवसात अहवाल दाखल करणार असल्याची माहिती दिली आहे. समितीच्या सदस्या अध्यक्षा हर्षदा देशमुख यांनी यासंबंधी माहिती दिली आहे. या प्रकरणात जे दोषी आढळतील त्यावर कारवाई होईल, कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही असं हर्षदा देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे. महिला बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांचा बेशरमपणाचा कळस करत चक्क महिला अंगणवाडी कार्यकर्त्याच्या शासकीय कामकाजाच्या ग्रुपवर स्वतः चा न्यूड फोटो पोस्ट केला. या प्रकरणात माहिला आज सकाळपासून तक्रार घेऊन बीड शिवाजीनगर पोलिसांकडे गेल्या. मात्र, आद्यपपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळे महिलांमध्ये नाराजी आहे. प्रत्येक पालकासाठी अतिशय महत्त्वाची बातमी, महाराष्ट्र सायबरनं केलं आवाहन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस टाळाटाळ करत असून उलट पोलीस महिलांची चौकशी करत असल्याचा आरोप महिला अंगणवाडी कार्यकर्त्या करत आहेत. या सगळ्यामुळे पालकमंत्री आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी यात लक्ष घालावं आशी मागणी माहिला करत आहेत. अनलॉकनंतर आता पुन्हा लॉकडाऊन होणार का? राजेश टोपेंनी दिली महत्त्वाची माहिती दरम्यान, या प्रकरणी अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी, त्यांनी असा लज्जास्पद प्रकार का केला याचीदेखील चौकशी व्हावी अशी महिलांची मागणी आहे. पण त्यासाठी त्यांनी पोलीस सहाकार्य करत नसल्याची त्यांची तक्रार आहे. महिला शिक्षकांसोबत कामाच्या ग्रुपवर असा घाणेरडा प्रकार करणाऱ्या अधिकाऱ्यावर कठोर कारवाई व्हावी अशी या महिलांची मागणी आहे. त्यामुळे यामध्ये धनंजय मुंडे महिलांना मदत करतील का हे पाहणं महत्त्वाचं आहे.
Published by:Renuka Dhaybar
First published:

Tags: Dhananjay munde

पुढील बातम्या