Elec-widget

युद्धाभ्यासात जवानाला वीरमरण, कुटुंबीयांशी 'ते' बोलणे ठरले शेवटचे

युद्धाभ्यासात जवानाला वीरमरण, कुटुंबीयांशी 'ते' बोलणे ठरले शेवटचे

परमेश्वर यांच्या पश्चात पत्नी दमावंती, दीड वर्षांची मुलगी विद्या, आई, वडील आणि तीन भाऊ असा परिवार आहे.

  • Share this:

सुरेश जाधव,(प्रतिनिधी)

बीड,20 नोव्हेंबर: राजस्थान जैसलमेर येथे युद्धाभ्यासात जवान परमेश्वर बाळासाहेब जाधवर (वय-26) शहीद झाल्याची घटना मंगळवारी सांयकाळी घडली. परमेश्वर हे धारूर तालुक्यातील घागरवाडा येथील रहिवासी होते. परमेश्वर जाधवर हे 514 वायुसेना रेजिमेंटमध्ये कार्यरत होते.सुभेदार अंकुश वळकुंडे यांनी दिलेल्या माहितीवरुन बुधवारी दुपारनंतर शहीद परमेश्वर जाधवर यांचे पार्थिव घागरवाडा येथे पोहोचणार आहे. सायंकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतील.

कुटुंबीयांशी 'ते' बोलणे ठरले शेवटचे..

परमेश्वर यांचे माध्यमिक शिक्षण उमरी (ता.माजलगाव) येथे तर उच्चशिक्षण पिंपळनेर येथे झाले होते. परमेश्वर जाधवर यांची पाच वर्षापूर्वी बीड येथील सैन्य भरतीच्या माध्यमातून भारतीय सैन्यात दाखल झाले होते. सध्या परमेश्व जैसलमेर येथे कार्यरत होते. अत्यंत गरीब कुटुंबाला परमेश्वर हेच एकमेव आधार होते. परमेश्वर यांच्या पश्चात पत्नी दमावंती, दीड वर्षांची मुलगी विद्या, आई, वडील आणि तीन भाऊ असा परिवार आहे.

मंगळवारी (19 नोव्हेंबर) सांयकाळी 6 ते 7 च्या दरम्यान परमेश्वर यांचे कुटुंबीयांशी बोलणे झाले होते. ते शेवटचे ठरल्याची भावना त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. यानंतरच युद्धाभ्यासादरम्यान त्याला वीरमरण आले तर एक जवान जखमी झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे घागरवाडा गावासह संपूर्ण बीड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

Loading...

भावाचे स्वप्न पूर्ण करणार...

शहीद परमेश्वर यांचा धाकटा भाऊ विक्रम देखील सैन्यात जाण्याची तयारी करत आहे. विक्रमने लेखी परीक्षेत यश मिळवले आहे. रत्नागिरी येथे नुकतीच त्याची शारिरीक चाचणी पूर्ण झाली आहे. भावाचे देशसेवेचे स्वप्न पूर्ण करणार असल्याची भावना विक्रम याने व्यक्त केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 20, 2019 02:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com