बीड 09 जानेवारी : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे पदभार स्वीकारल्यानंतर आज पहिल्यांदाच भगवानगडावर आले. नगद नारायण गड, भगवान गड गहिनीनाथ गड व जिल्ह्यातील इतर कोणत्याही गडावर इथून पुढे राजकारण होणार नाही, होवू दिलं जाणार नाही. असा टोला त्यांनी लगावला. शक्ती पिठाचे दर्शन घेवून विकासाला सुरुवात करणा, मी उतणार नाही, मातणार नाही घेतलेला वसा टाकणार नाही हा शब्द मी तुम्हाला देतो असं सांगत त्यांनी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना टोला लगावला. ते म्हणाले, विकासाचा हा शब्द देत धनंजय मुंडेनी नव्या इनिंग ला सुरुवात केली.
मंत्री आणि पालकमंत्री आज पहिल्यादा बीड जिल्हा दौऱ्यावर आल्यानंतर त्यानी सर्वप्रथम नगद नारायण गडावर जावून दर्शन घेतलं. यावेळी गडाच्या वतीने त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी आमदार प्रकाश सोलंके, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार बाळासाहेब अजबे, माजी आमदार अमरसिंह पंडित, महंत शिवाजी महाराज यांची उपस्थिती होती.
शेतकरी आत्महत्येला शरद पवारच जबाबदार, संघटनेतील नेत्याचा घणाघाती आरोप
महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्री झाल्यानंतर सामाजिक न्याय मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यावर पहिल्यांदाच धनंजय मुंडे गडावर नगद नारायणाच्या समाधी पुढे नतमस्तक झाले. ते नारायण गडाचे दर्शन घेऊन त्यांनी पुढे भगवान गडाचं दर्शन घेतलं.
राज ठाकरेंसोबत भेटच झाली नाही, देवेंद्र फडणवीसांनी केला 'मनसे' दावा
पुढे बोलताना ते म्हणाले की जिल्ह्याच्या विकासासाठी नगद नारायणाने आशीर्वाद द्यावेत, देवस्थान च्या विकास करण्यासाठी अर्थमंत्री अजित पवार यांना घेवून येणार आहे. आराखड्या बाहेर जावून विकास केला जाईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.