रक्षाबंधनाच्याच दिवशी बहिण भावावर काळाचा घाला, मुलीची मृत्यूशी झुंज

रक्षाबंधनाच्याच दिवशी बहिण भावावर काळाचा घाला, मुलीची मृत्यूशी झुंज

स्वातंत्र्य दिवस असल्याने संभाजीने नेताजी सुभाषचंद्र बोस यांची वेशभुषा केली होती. मात्र नियतीला ते मंजूर नव्हतं. ही भावंड बस स्टॉपवर असतानाच एका भरधाव कारने या दोघांनाही धडक दिली.

  • Share this:

सचिन जिरे, औरंगाबद 15 ऑगस्ट : रक्षाबंधन आणि 15 ऑगस्ट एकाच दिवशी आल्यानं गुरुवारी राज्यात आनंदाचं वातावरण होतं. मात्र औरंगाबादमधल्या बहिण भावंडांसाठी आजचा दिवस काळवार ठरला. शाळेत जाण्यासाठी बसची वाट पाहात उभ्या असलेल्या छोट्या बहिण भावंडांना मोठा फटका बसला. एक भरधाव कारणे या चिमुकल्यांना उडवलं त्यात भावाचा मृत्यू झाला तर बहिण गंभीर जखमी आहे.

विखे पाटलांनी केलं शरद पवारांना टार्गेट, पूरग्रस्त भागातील कामावरून म्हणाले...

संभाजी ज्ञानेश्वर शिंदे (वय 6) हा पहिलीत होता. तर त्याची बहिण श्रावणी (वय 9) ही तिसरीत होती. संभाजी आणि श्रावणी हे शाळेत जाण्यासाठी बसची वाट बघत होते. स्वातंत्र्य दिवस असल्याने संभाजीने नेताजी सुभाषचंद्र बोस यांची वेशभुषा केली होती. मात्र नियतीला ते मंजूर नव्हतं. ही भावंड बस स्टॉपवर असतानाच एका भरधाव कारने या दोघांनाही धडक दिली.

या धडकेत संभाजीचा जागीच मृत्यू झाला तर श्रावणी तब्बल 20 फुट फरफटत गेली. तिची प्रकृती गंभीर असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघाताने शिंदे कुटुंबीयांवर मोठं संकट कोसळलं. कारचालक हा अल्पवयीन होता अशी माहिती पोलिसांनी दिलीय. आज सकाळी  साडे सहा वाजता झलटागाव मधील जालना बीड बायपास येथे कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.

बिबट्या मादी आणि तिच्या पिलाच्या भेटीचा चटका लावणारा VIDEO तुम्ही पाहिलाच पाहिजे

स्वतंत्र दिनानिमित्त  कार्यक्रमात संभाजी हा नेताजींची भूमिका साकारणार असल्यानं तो अत्यंत आनंदात होता. शाळेतून घरी आल्यावर राखी बांधू असे सांगून तो गेला मात्र त्या पूर्वीच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. रक्षाबंधनाच्या दिवशीच बहीण भावा वर काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: August 15, 2019, 4:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading