'हॅप्पी बर्थडे कृष्णा' म्हणत केक कापून बीडमध्ये आगळावेगळा कृष्णजन्मोत्सव साजरा

'हॅप्पी बर्थडे कृष्णा' म्हणत केक कापून बीडमध्ये आगळावेगळा कृष्णजन्मोत्सव साजरा

जगन्नाथ मंदिर येथे श्रीकृष्णजन्मोत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. मध्यरात्री बाराच्या सुमारास भजन कीर्तनाच्या गजरामध्ये हा जन्मोत्सव साजरा करताना महिलांनी श्रीकृष्णाचा पाळणा गायिला.

  • Share this:

बीड, 24 ऑगस्ट- शहरातील जगन्नाथ मंदिर येथे श्रीकृष्णजन्मोत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. मध्यरात्री बाराच्या सुमारास भजन कीर्तनाच्या गजरामध्ये हा जन्मोत्सव साजरा करताना महिलांनी श्रीकृष्णाचा पाळणा गायिला. एवढेच नाही तर यावेळी 'हॅप्पी बर्थडे कृष्णा' म्हणत केक कापण्यात आली. गोकुळाष्टमीला आता आधुनिकतेचे स्वरूप आल्याचे दर्शन झाले. एवढेच नाही तर मंदिराची सजावट मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती.

कृष्णाचा वाढदिवस अर्थात श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा संपूर्ण देशभरामध्ये साजरा केला जात असताना बीडमधील जगन्नाथ मंदिरातही सोहळा मोठ्या भक्तीभावनेने पार पडला. शनिवारी सकाळी गोपाळकाल्याचे वाटप करण्यात आले. रात्रीच्या वेळी या मंदिरातील राधाकृष्णाच्या मूर्ती सर्व भाविकांचे लक्ष वेधून घेतले.

दहीहंडीच्या उत्साहाला यंदा ओहोटी...

दरम्यान, कोल्हापूर आणि सांगली येथील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुंबई, ठाण्यातील दहीहंडीच्या उत्साहाला यंदा ओहोटी आल्याचे चित्र दिसत आहे. दहीहंडीच्या उत्साहावरील खर्चाला कात्री लावल्याचे आयोजक सांगत आहे. मात्र, यंदा आर्थिक मंदी आणि उत्सवातून मिळणाऱ्या प्रसिद्धीला लागलेली ओहोटी हे देखील प्रमुख कारण असल्याची माहिती आयोजकांकडून मिळाली आहे.

मुंबईसह ठाणे शहरातील दहीहंडी उत्सवात यंदा कधी नव्हे इतका निरुत्साह दिसून येत आहे. कोणत्याही आयोजकाने बक्षिसांची रक्कम जाहीर न करण्याचे हे दहीहंडीच्या गेल्या 15 वर्षांतल्या परंपरेतले पहिलेच वर्ष आहे.

पूरग्रस्तांना 2 लाख 51 हजारांची मदत..

डोंबिवलीच्या मानपाडा चौकात मनसेची दहीहंडी मोठ्या जल्लोषात फुटते. परंतु यंदा कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पूरस्थिती उद्भवली आहे. मनसेने दहीहंडीला होणारा कार्यक्रम यंदा रद्द करून पूरग्रस्तांना 2 लाख 51 हजार रुपयांची मदत पाठवली आहे.

VIDEO: गोविंदा आला रे आला! 'विजेता' सिनेमाच्या सेट सेलिब्रिटींनी फोडली हंडी

First published: August 24, 2019, 1:48 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading