Home /News /maharashtra /

अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याच्या चर्चेवर शिवसेनेच्या मोठ्या नेत्याचा खुलासा

अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याच्या चर्चेवर शिवसेनेच्या मोठ्या नेत्याचा खुलासा

शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी मांडलेल्या भूमिकेमुळे अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

    मुंबई, 4 जानेवारी : शिवसेनेचे नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचं वृत्त आलं आहे. सत्तार यांच्या राजीनाम्याचे बातमीने महाविकास आघाडी सरकारमध्ये भूकंप झाला. मात्र शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी मांडलेल्या भूमिकेमुळे अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. 'अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेच्या कोणत्याच नेत्यांकडे राजीनामा दिलेला नाही,' अशी माहिती शिवसेना सचिव आणि खासदार अनिल देसाई यांनी दिली आहे. त्यामुळे अब्दुल सत्तार यांनी खरंच राजीनामा दिला आहे का, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. शिवसेना नेते अनिल देसाई यांनी जरी सत्तार यांनी राजीनामा दिला नसल्याचं म्हटलं असलं तरीही अब्दुल सत्तार हे शिवसेनेत नाराज असल्याचं स्पष्ट आहे. कारण अब्दुल सत्तार हे कॅबिनेट मंत्रिपदासाठी इच्छुक होते. मात्र शिवसेनेकडून त्यांना राज्यमंत्रिपद देण्यात आलं. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीबद्दल निलेश साबळेने व्यक्त केलं मत, म्हणाला... अब्दुल सत्तारांचा काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश काँग्रेसमधून बंडखोरी करत अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेत प्रवेश केला. अब्दुल सत्तार हे खरंतर भाजपमध्ये प्रवेश करणार होते. लोकसभा निवडणुकीच्या आधी सत्तार यांनी माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यामुळे ते भाजपमध्ये जाणार का अशा चर्चांना उधाण आलं होतं. मात्र सत्तार यांना सिल्लोड मतदारसंघातून भाजपच्या कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध करण्यात आला. त्यामुळे काँग्रेसपासून दूर गेलेले अब्दुल सत्तार शिवसेनेत गेले. जिल्हा परिषद निवडणुकीबाबतही नाराजी सध्या राज्यभर जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा धुराळा उडाला आहे. औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेनं काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र सत्तार यांनी शिवसेनेपासून वेगळी भूमिका घेत शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सत्तार यांच्या राजीनाम्यामागे जिल्हा परिषद निवडणुका हेदेखील कारण असल्याचं सांगितलं जात आहे.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Abdul sattar, Shivsena

    पुढील बातम्या