Home /News /maharashtra /

रस्त्याच्या टेंडरवरून शिवसेनेच्या आमदार आणि कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

रस्त्याच्या टेंडरवरून शिवसेनेच्या आमदार आणि कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

टेंडर भरू नये यासाठी आमदार सिरसाट यांच्याकडून मारहाण झाली असा आरोप करण्यात आलाय.

औरंगाबाद 22 जानेवारी : राज्यात ज्या पक्षाचे सरकार येते त्या पक्षाच्या नेते आणि कार्यकर्ते यांच्यात कमाईसाठी चढाओढ सुरू होते. या चढाओढीतून मग होतात पक्षांर्गत स्पर्धा,  भांडणं आणि मारामारी. असाच प्रकार औरंगाबादेत घडला आहे.  रस्त्याचं टेंडर घेण्यावरून शिवसेना आमदार आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये राडा झाला. आमदार आणि कार्यकर्त्यांची चक्क रस्त्यावर मारामारी झालीय. आमदार आहेत औरंगाबाद पश्चिम मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार संजय सिरसाट आणि माजी नगरसेवक सुशील खेडकर. या प्रकरणी खेडकर यांनी आमदार सिरसाट यांच्या विरोधात मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दिल्याने गुन्हा दाखल झाला आहे. सातारा देवळाई भागातील 2 कोटींच्या रस्त्याच्या कामाचे टेंडर सुशील खेडकर यांनी नियमानुसार भरले. मात्र खेडकर यांचे टेंडर  सार्वजनिक बांधकाम विभागाने लगेच अपात्र  ठरवले. हा खटाटोप फक्त आमदार सिरसाट यांच्या मर्जीच्या ठेकेदाराला काम मिळावे यासाठी मला अपात्र ठरवले असा आरोप खेडकर यांनी केला. हे प्रकरण आपल्या अंगलट येईल असं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लक्षात आल्यावर त्यांनी सर्व टेंडर प्रक्रिया रद्द केली. आदित्य ठाकरे ठाकरे न्याय द्या, नाही तर जलसमाधी घेणार; रिव्हर राफ्टींग बंद आणि नव्याने  टेंडरसाठी निविदा काढली. त्यानंतर टेंडर भरू नये यासाठी आमदार सिरसाट यांच्याकडून मारहाण झाली असा आरोप खेडकर यांनी केलाय. हे प्रकरण औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या पर्यंत गेले. त्यांनी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना प्रकरण मिटवण्याचे आदेश दिले. हे भांडण आमच्या घरातील आहे आणि ते औरंगाबाद किंवा मातोश्री वर मिटवले जाईल अशी प्रतिक्रिया खैरे यांनी दिली होती. तर आमदार सिरसाट यांनी आपल्यावरचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. नाईट लाईफला ठाकरे सरकारची तत्वत: मंजुरी, भाजप म्हणते...ही तर किलींग नाईट! या आधी मंत्री यशोमती ठाकूर यांनी आत्ताच आम्ही सत्तेवर आलोय. अजुन खिसे गरम व्हायचे आहेत असं वक्तव्य केलं होतं. त्यावरून वादही झाला होता. आता हे आमदारांच्या हाणामारीचं प्रकरण घडल्याने विरोधकांना आयतीच संधी मिळाली आहे.
First published:

Tags: Sanjay shirsath

पुढील बातम्या