औरंगाबादेत शिवसेनेच्या नगरसेविकेने भर सभेत भिंतीवर आपटले डोके

औरंगाबादेत शिवसेनेच्या नगरसेविकेने भर सभेत भिंतीवर आपटले डोके

शिवसेनेच्या नगरसेविका मीना गायके यांनी यांनी आत्महत्येची धमकी देत महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सभागृहाच्या भिंतीवर डोके आपटून घेतल्याचे समोर आले आहे.

  • Share this:

औरंगाबाद, 12 सप्टेंबर: शिवसेनेच्या नगरसेविका मीना गायके यांनी यांनी आत्महत्येची धमकी देत महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सभागृहाच्या भिंतीवर डोके आपटून घेतल्याचे समोर आले आहे. वॉर्डातील कामांचे बिल काढण्यासाठी टाळाटाळ तसेच उद्दामपणाची भाषा करणाऱ्या मुख्य लेखाधिकारी सुरेश केंद्रे यांच्याविरुद्ध तत्काळ निलंबनाची कारवाई करण्याची मागणी मीना गायके यांनी केली आहे. या प्रकारामुळे सर्वसाधारण सभेत एकच गोंधळ उडाला. याप्रकरणी मुख्य लेखाधिकारी सुरेश केंद्रे यांना पालिका सेवेतून मुक्त करण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत.

सभागृहातच आत्महत्या करीन...

सुरेश केंद्रेंवर आताच कारवाई करा, अन्यथा सभागृहातच आत्महत्या करीन, असा इशारा मीना गायके यांनी दिला. केंद्रेंना नगरसेवकांच्या मागणीवरून महापौरांनी बाहेर जाण्यास सांगितले. केंद्रे बाहेर जाण्यास निघताच गायके यांनी त्यांचा रस्ता अडवून सभागृहाच्या भिंतीवर स्वत:चे डोके आपटले. यानंतरही त्यांना गहिवरून आले होते. संताप अनावर झाल्याने गायकेंना भोवळ येऊन त्या जमिनीवर कोसळल्या. त्यामुळे सर्वांचीच धांदल उडाली. थोड्या वेळाने त्यांना खासगी रुग्णालयात हलवले. रात्री साडेसात वाजता ईसीजी करून त्यांना नॉर्मल असल्याचे सांगितले. अचानक झालेल्या या प्रकारानंतर महापौरांनी सभाच गुंडाळली. महापालिकेच्या प्रबोधनकार ठाकरे सभागृहात झालेल्या सर्वसाधारण सभेत बुधवारी हा प्रकार घडला.

काय आहे प्रकरण?

मागील 2 वर्षांपासून मीना गायके यांच्या वॉर्डात ड्रेनज लाइन, जलवाहिनी सोबतच टाकल्या होत्या. दोन्ही लाइन चोकअप असून त्यामुळे नागरिकांना दूषित पाणी जात असल्याने याची दुरुस्तीचा विषय मंजूर झाला. ठेकेदाराने निम्मे कामही केले. उर्वरित काम करण्यासाठी ठेकेदाराला बिल दिले नसल्याने त्यांनी काम थांबवले होते. दोन महिन्यांपूर्वी आयुक्तांनी या ठेकेदाराला पाच लाख रुपये उर्वरित काम करून घेण्यासाठी केंद्रे आणि पाणीपुरवठा विभागाला आदेश दिले होते. मात्र अद्यापही बिल अदा करण्यात आले नव्हते.

VIDEO: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंडे बंधु-भगिनीत जुंपली; केला 'हा' गंभीर आरोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 12, 2019 12:03 PM IST

ताज्या बातम्या