मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

साईबाबा बीडमध्ये नोकरीला होते, शिर्डी आणि पाथरीच्या वादाला नवं वळण

साईबाबा बीडमध्ये नोकरीला होते, शिर्डी आणि पाथरीच्या वादाला नवं वळण

साईबाबा बीडमध्ये हातमागाच्या दुकाना कामगार होते. 4 ते 5 वर्ष ते बीडमध्ये कामासाठी राहिले होते असा दावा केला जातोय.

साईबाबा बीडमध्ये हातमागाच्या दुकाना कामगार होते. 4 ते 5 वर्ष ते बीडमध्ये कामासाठी राहिले होते असा दावा केला जातोय.

साईबाबा बीडमध्ये हातमागाच्या दुकाना कामगार होते. 4 ते 5 वर्ष ते बीडमध्ये कामासाठी राहिले होते असा दावा केला जातोय.

बीड 21 जानेवारी : जगाला समतेची शिकवण देणाऱ्या शिर्डी साईबाबांचा जन्म कुठे झाला यावरून शिर्डी आणि पाथरीत वाद सुरू आहे. हा वाद थोडा थंड झाला असतानाच आता त्यात बीडने उडी घेतलीय. साईबाबा हे बीडमध्ये नोकरीला होते असा दावा काही जणांनी केलाय. त्यामुळे बीडच्या विकासासाठीही 100 कोटींचा निधी द्यावी अशी मागणी आता पुढे आली आहे. त्यामुळे या वादाला नवं वळण मिळण्याची शक्यता आहे.साईबाबा पाथरीहून शिर्डीसाठी जात असताना बीडमध्ये काही काळ वास्तव्यास होते. याठिकाणी साईबाबांनी नोकरी केली, त्यामुळे साईंची कर्मभूमी म्हणून बीडच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी १०० कोटींचा निधी द्यावा अशी मागणी बीडमधील साईभक्तांनी केली आहे. राष्ट्रीय कीर्तनकार भरत बुवा रामदासी यांनी मौखिक पुरावे असल्याचे दाखले दिले आहेत. तर साईबाबा बीडमध्ये असल्याचं साईचरित्रात उल्लेख आहे. मौखिक परंपरेनुसार जनार्दन महाराज पाटणकर यांनी सांगितलं होतं की, साईबाबा बीडमध्ये हातमागाच्या दुकानाता कामाला होते. 4 ते 5 वर्ष ते बीडमध्ये कामासाठी राहिले होते. असे साई भक्त आणि राष्ट्रीय किर्तनकार भरत बुवा रामदासी म्हणाले. साईबाबांचा जन्म परभणी जिल्ह्यातल्या पाथरी इथं झाला असं म्हटलं जातं. 'फक्त मुस्लिमांच्या आग्रहामुळे काॅंग्रेस शिवसेनेसोबत सत्तेत' पाथरीच्या विकासासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 100 कोटी रुपये जाहीर केले होते. त्यामुळे वाद भडकला होता. पाथरीला शिर्डी बाबांचं जन्मस्थळ म्हणून पैसे देऊ नये अशी मागणी शिर्डी ग्रामस्थांनी केली होती. त्यासाठी त्यांनी बेमुदत बंदही पुकारला होता. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेत बैठक आयोजित केली होती त्यात तोडगा निघाल्याने बंद मागणे घेण्यात आला. पाथरीकरांच्या भुमिकेकडे दुर्लक्ष करणार असल्याची शिर्डी ग्रामस्थांची भूमिका. मुख्यमंत्र्याकडुन समाधानकारक उत्तर मिळालय. आमचा वाद मिटलाय. पाथरीला विकास निधी देताना जन्मस्थळ असा उल्लेख करणार नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आश्वासन. पाथरीला विकास निधी देण्यास शिर्डी करांचा विरोध नाही. राज ठाकरे इज बॅक! शिवसेनेच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी मनसेचा मेकओव्हर पाथरीकर काय म्हणतात याकडे शिर्डीकर दुर्लक्ष करणार. बाबांचे जन्मस्थान असल्याचा देशातील अनेक गावांचा दावा. पाथरी नंतर आता कल्याण , धुपखेडा येथुनही वेगवेगळे दावे होतोय. सर्वांना आमच्या शुभेच्छा आहेत अशी प्रतिक्रिया  साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त कैलास कोते यांनी व्यक्त केलीय.
First published:

Tags: Shirdi sai baba sansthan

पुढील बातम्या